धरणे फुल्ल भरलेली, पण नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही !

0
39

नाशिक – एकीकडे शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे फुल्ल भरलेली असताना शहरातील अनेक भागात मात्र साधे पिण्याचे पाणी मिळत नसल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या महिलांनी आज राजीव गांधी भवनासमोर हंडा मोर्चा काढला होता.

महापालिकेत प्रशासक राजवट येण्यापूर्वी जे अनेक काळापासून महापालिकेत लोकप्रतिनिधी म्हणून काम पहिले होते, तेच ह्या मोर्च्याचे नेतृत्व करत होते, हे इथे विशेष. त्यामुळे महापालिकेच्या आवारात ह्यावरून मोठी चर्चा झाली होती. शहर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला, ज्यामुळे विविध धरणक्षेत्रातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली होती. त्यातच शहराचा पाणीपुरवठा करणारा गंगापूर धरणही जवळपास ९६ टक्के भरला आहे. असे असूनही, सातपूर परिसरातील प्रभाग क्र. ९ व अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसल्याचा आरोप यावेळी महिलांनी केला आहे.

विशेष म्हणजे प्रभागाच्या काही अंतर जवळ गंगापूर धरण व जलशुद्धीकरण केंद्रे आहे, तरीही आमच्या प्रभागासह इतर भागात पाणी येत नाही. जेव्हा महापालिकेत प्रशासक आले, तेव्हापासूनच ही परिस्थिती नागरिकांवर ओढवली असल्याचा आरोपही मोर्चेकर्यांनी यावेळी केला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी सातपूर परिसरात फुटलेल्या पाईपलाईनचे काम कधी होणार ? असा सवाल करत पाणीपुरवठा विभागाला जाब विचारला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी पालिका प्रशासनाला निवेदन देत विभागातील पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवण्याची मागणी केली आहे.

तसेच, येत्या दोन दिवसात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला नाही, तर आम्ही लोकशाही मार्गाने जनआंदोलन करू आणि होणाऱ्या परिणामास सर्वस्वी आयुक्त व संबंधित विभागाचे अधिकारी जबाबदार राहतील, असे आव्हानही प्रस्तुत निवेदनात करण्यात आले आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here