‘Nashik Transport Association’ च्या पदाधिकाऱ्यांनी नागपुरात घेतली मंत्र्यांची भेट

0
83
Nashik Transport Association
Nashik Transport Association

Nashik Transport Association | नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीत ट्रक टर्मिनल विकसित करण्याच्या नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या मागणीला यश मिळत असून आता अंबड येथे सुसज्ज असे ट्रक टर्मिनल विकसित करण्यात येत आहे. त्याचबरोबर आता लवकरच सातपूर आणि सिन्नर औद्योगिक वसाहतीत मोठ्या भूखंडावर ट्रक टर्मिनल विकसित करण्यात येईल तसेच नाशिक ट्रान्सपोर्टच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून या मागण्या मार्गी लावल्या जातील असे आश्वासन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या शिष्टमंडळाला दिले आहे. यावेळी नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे उपस्थित होत्या.

देवळा | भावडेच्या व्ही.के.डी. इंग्लिश मीडियम शाळेत भरले आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन

Nashik Transport Association |  कोणकोणत्या नेत्यांची घेतली भेट?

नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या मागण्या मार्गी लावल्याबाबत नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या शिष्टमंडळाने नागपूर येथे सुरु असलेल्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनात राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे तसेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन आभार मानले आहेत.

तसेच सातपूर आणि सिन्नर औद्योगिक वसाहतीत मोठ्या भूखंडावर ट्रक टर्मिनल विकसित करण्यासोबतच अंबड ट्रक टर्मिनल ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनला देण्यात यावा याबाबत चर्चा केली. यावेळी आमदार सीमा हिरे, नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, कार्याध्यक्ष पी. एम. सैनी, पदाधिकारी सुभाष जागंडा, संजु तोडी, रामभाऊ सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Nashik Crime | नाशकात दारूवरून फटकारल्याने भाच्याने मामाचा केला खून

यावेळी अंबड येथे ट्रक टर्मिनल विकसित करण्यात येत असल्याबाबत या शिष्टमंडळाने राज्य शासनाचे आभार मानले आहे. तसेच यावेळी अंबड येथे विकसित करण्यात येत असलेल्या ट्रक टर्मिनलची जागा ही अतिशय छोटी असल्याने सातपूर आणि सिन्नर येथे ट्रक टर्मिनल विकसित करताना मोठा भूखंडावर विकसित करण्यात यावे अशी मागणी या शिष्टमंडळाकडून करण्यात आली. या मागणीला मंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सातपूर आणि सिन्नर औद्योगिक वसाहतीतील ट्रक टर्मिनल आवश्यक त्या मोठ्या भूखंडावर लवकरच विकसित करण्यात येईल असे आश्वासन या शिष्टमंडळाला दिले आहे.

अंबड औद्योगिक वसाहतीत विकसित करण्यात येत असलेले ट्रक टर्मिनल ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर नाशिक जिल्हा ट्रान्स पोर्ट संघटनेला विकसित करण्यासाठी देण्यात यावा. याठिकाणी सारथी सुविधा केंद्राचे मॉडेल संकल्पना राबविण्यात येईल अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली असून या मागणीलाही मंत्री उदय सामंत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नासिकचे पालकमंत्री दादाजी भुसे तसेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here