Nashik Teachers Constituency Result | बहुप्रतीक्षित अशा शिक्षक आणि पदवीधर मतदार संघांच्या निवडणुकींचा निकाल आज जाहीर होणार असून, यासाठी मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजेपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली असून, ही मतमोजणी 30 टेबलवर होणार आहे.(Nashik Teachers Constituency Result)
तर, प्रत्येक टेबलवर सहा असे एकूण 180 कर्मचारी मतमोजणीसाठी तैनात करण्यात आलेले आहे. मात्र, कोटा पद्धतीमुळे निकाल जाहीर होण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यातच आता नाशिक शिक्षक मतदार संघाच्या मतमोजणी केंद्रावरून मोठी बातमी समोर आली असून, यानुसार मतमोजणीच्या सुरुवातीलाच आक्षेप घेत मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. मतपत्रिका जास्त निघल्याने मतमोजणी थांबवण्यात आली आहे. (Nashik Teachers Constituency election Result)
Nashik Teachers Constituency Result | नेमकं काय घडलं..?
मतपेट्यामधील मतं पत्रिका बाहेर काढण्यात आल्या. मात्र, मतदान टेबलवर मतदानपत्रिका लावताना त्यात मतपत्रिका लावताना हिशोबापेक्षा 3 मतपत्रिका जास्त निघाल्या. त्यामुळे यावर ठाकरे गटाने आक्षेप घेतल्याने मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली. तर, या जास्त मतपत्रिका निघालेल्या टेबलवर पुन्हा एकदा मतपत्रिका मोजण्याचा कामाला सुरुवात करण्यात आली आहे. (Nashik Teachers Constituency Result)
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीसाठी एकूण 93 .48 टक्के मतदान झाले असून, 64 हजार 848 मतांपैकी वैध मते ठरवले जातील. पहिल्या टप्प्यात 50 मतांचे गठ्ठे बांधले जातील आणि त्यानंतर वैध व अवैध मतांची विभागणी होईल. मतांचा कोटा निश्चित होईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी सुरु होईल. सुरुवातीला पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी होऊन नंतर कोटा पूर्ण होईल. तोपर्यंत दुसऱ्या मतांची उलट्या क्रमाने मतमोजणी होईल. तर, सर्वप्रथम कोटा पूर्ण करणारा उमेदवार विजयी घोषित केला जाईल. दरम्यान, सकाळीच मतमोजणी केंद्रावर शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी दाखल झाले आहेत.
नाशिकची निवडणूक सुरुवातीपासूनच चर्चेत
नाशिक शिक्षक मतदार संघ सुरुवातीपासूनच चर्चेत राहिला असून, येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार शिंदे गटाचे किशोर दराडे, महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे संदीप गुळवे, अजित पवार गटाचे महेंद्र भावसार, आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महायुतीचेच दोन उमेदवार एकमेकांच्या विरोधात असल्याने आणि इतिहासात पहिल्यांदाच विधानपरिषदेच्या निवणुकीसाठी थेट मुख्यमंत्र्यांना मैदानात उतरावे लागल्याने ही निवडणूक चांगलीच चर्चेत राहिली आहे.
Nashik Teachers Constituency | विधान परिषद निवडणूकीसाठी देवळा येथे ९६.८३ टक्के मतदान
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम