Nashik Teachers Constituency | नाशिक शिक्षक मतदारसंघात निकालापूर्वीच झळकले उमेदवारांच्या विजयाचे बॅनर

0
72
Nashik Teachers Constituency
Nashik Teachers Constituency

नाशिक :  विधान परिषदेच्या मुंबई, कोकण पदवीधर आणि मुंबई, नाशिक शिक्षक या चार मतदार संघांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. काल २६ जून रोजी मतदान झाले असून, १ जुलै रोजी या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. महायुतीच्याच दोन्ही मित्रपक्षांनी एकमेकांविरोधात उमेदवार दिल्याने नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक चर्चेत राहिली.

नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी २१ उमेदवार रिंगणात होते. तर, मुख्य लढत ही शिंदे गटाचे किशोर दराडे(Kishor Darade), ठाकरे गटाचे संदीप गुळवे (Sandeep Gulve), अजित पवार गटाचे महेंद्र भावसार(Mahendra Bhavsar), आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्यात होती. निवडणुकीच्या एक दिवस आधीच येवल्यात पैशांचे पाकीटं सापडली होती. तर, मतदानाच्या दिवशीही नाशिकमधील एका मतदान केंद्राबाहेर पैसे वाटप करतानाचा प्रकार उघडकीस आला होता. शिंदे गटाकडून हे पैसेवाटप झाल्याचे आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आले होते. दरम्यान, १ जुलैला निकाल लागणार असून, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी निकालाच्या ३ दिवस आधीच त्यांच्या विजयाचे बॅनर लावले आहेत. (Nashik Teachers Constituency)

Nashik Teachers Constituency | विधान परिषद निवडणूकीसाठी देवळा येथे ९६.८३ टक्के मतदान

Nashik Teachers Constituency | निकालाआधीच विजयाचे बॅनर

१ जुलैला नाशिक शिक्षक मतदार संघांचा निकाला जाहीर होणार असून, त्यापूर्वीच कोपरगावमध्ये (Kopargaon) अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. हे बॅनर विवेक कोल्हे यांच्या समर्थकाने लावले असून, यावर “मी विवेक स्नेहलता बिपिन दादा कोल्हे, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की”, असा यांसी आहे. दरम्यान, नकालापूर्वीच लवण्यात आलेल्या हा बॅनर सध्या नाशिक शिक्षक मतदारसंघात चर्चेचा विषय ठरत असून, १ जुलैला गुलाल कोण उधळणार..? विवेक कोल्हे जिंकणार..? की समर्थकांना बॅनर काढावे लागणार..? याकडे आता सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. (Nashik Teachers Constituency)

Nashik Teachers Constituency | नाशिकमध्ये नवा ट्विस्ट; शिक्षक मतदारांना भेटवस्तू आणि पैसे वाटप..?


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here