Nashik Teachers Constituency | नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या लढतीत दिंडोरी लोकसभेचा ‘तो’ फॉर्म्युला..?

0
35
Nashik Teachers Constituency Election
Nashik Teachers Constituency Election

Nashik Teachers Constituency :  राज्यात सध्या विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत असून, याही निवडणुकीत नाशिकमध्ये हाय व्हॉल्टेज ड्रामा पहायला मिळाला. एकीकडे बंडखोरी तर दुसरीकडे नामसाधर्म्य असलेले उमेदवार यामुळे ही लढत अधिक रंजक बनली ओटी. मात्र, अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी या उमेदवारांनी अर्ज मागे घेतली आणि तीन मुख्य उमेदवारांचे मार्ग मोकळे झाले.

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज माघारीचा काल अंतिम दिवस असल्याने अनेक राजकीय घडामोडी पहायला मिळाल्या. महायुती (Mahayuti) व महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) बंडखोरीचे वाद काल शमले. महायुतीत नाशिकची जागा शिंदे गटाच्या वाट्याला आली असून, येथे भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधु डॉ. राजेंद्र विखे पाटील (Rajendra Vikhe Patil) यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. तर महाविकास आघाडीत ही जगा ठाकरे गटाच्या वाट्याला आली असून, काँग्रेसचे दिलीप पाटील (Dilip Patil) यांनीही आपला अर्ज दाखल केला होता. (Nashik Teachers Constituency)

मात्र, काल दिल्लीतून सूत्र फिरल्यानंतर हे वाद शमले आणि अधिकृत उमेदवारांच्या वाटेतील अडथळे काहीसे कमी झाले. राजेंद्र विखे पाटील आणि काँग्रेसचे दिलीप पाटील यांनी अर्ज मागे घेतलले. त्यामुळे आता नाशिक शिक्षक मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विद्यमान आमदार किशोर दराडे (Kishor Darade), शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे (Sandeep Gulve) आणि अपक्ष उमेदवार कोपरगावचे विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे. लोकसभा निवडणुकीचा गुलाल उधळल्यानंतर आता शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा धुरळा उडाला आहे.  तर लोकसभेनंतर आता याही निवडणुकीत नाशिक शिक्षक मतदारसंघ प्रचंड चर्चेत आहे. (Nashik Teachers Constituency)

Nashik Teachers Constituency | शिक्षक आमदार पैठणी अन् पाकीट देणारा नसावा; गुळवेंचे दराडेंवर टीकास्त्र

Nashik Teachers Constituency |  २१ उमेदवार रिंगणात

वरिष्ठांच्या आदेशानुसार बुधवारी दुपारी भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधु आणि काँग्रेसच्या उमेदवाराने आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची चिंता काहीशी कमी झाली. तर, अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३६ पैकी १५ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. तर, आता २१ उमेदवार रिंगणात असून, मुख्य लढत ही तिरंगीच असणार आहे.

Teachers Constituency Election | नाशिकच्या उमेदवारीवरून पुन्हा महायुतीत बिघाडी?; नाशकात हाय व्हॉल्टेज ड्रामा

दिंडोरी लोकसभेचा ‘तो’ फॉर्म्युला..?

दरम्यान, ज्याप्रकारे दिंडोरी लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार बाबू भगरे (सर) यांना नामसाधर्म्य असल्याने जवळपास एक लाखाच्या वर मतं पडली. तोच काहीसा प्रकार याही निवणुकीत होतो की काय अशी चर्चा होती. कारण शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या कोपरगाव येथील किशोर प्रभाकर दराडे यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर, ठाकरे गटाचे संदीप गुळवे यांच्याही नावाशी नामसाधर्म्य असलेल्या दोन उमेदवारांनी अर्ज भरले होते. (Nashik Teachers Constituency)

मात्र, या डमी उमेदवारांनी माघार घेतल्याने दोन्ही उमेदवारांनी सुटकेचा श्वास टाकला आहे. विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्याशी साधर्म्य असलेल्या उमेदवारावर त्यांच्या समर्थकांनी अर्ज भरण्याच्या दिवशी दबाव टाकण्याचा प्रेतं केल्याचे समोर आले होते. तर, त्यानंतर ते बेपत्ता झाल्याचे त्यांच्या भावाने सांगितले. मात्र, बरोबर अर्ज माघारीच्या दिवशी ते प्रगट झाले आणि त्यांनी आपला अर्ज मागे घेतला.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here