नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याचे भूमिपुत्र माजी सेवानिवृत्त सैनिक अण्णासाहेब खैरनार यांची नुकतीच मा.शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्या नाशिक जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवार ता.१७ पुणे येथील आय बी रेस्ट हाऊस मध्ये झालेल्या शेतकरी संघटनेच्या बैठकीत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांनी अण्णासाहेब खैरनार यांची स्व शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य, भारत या संघटनेच्या नाशिक जिल्हाध्यक्ष पदावर सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जाहीर निवड केली.
यानंतर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत पुणे येथील महात्मा गांधी,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार व संघटनेचे शेतकऱ्यांच्या हिताचे ध्येय धोरण यासंदर्भातले निवेदन ठेऊन राज्यभर माननीय महाराष्ट्र राज्य अन्न आयोग व मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची सक्तीने वीज बिल वसुली करू नये आणि शेतकऱ्यांचे कृषी पंपाला सलग वीज पुरवठा करावा तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचे पालन करावे अश्या अनेक विविधांगी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी व मागील चार वर्षातील थकीत एफ आर पी वर देण्याचा संदर्भात अत्यंत कडक व सक्त आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत.
शेतकऱ्यांना चौदा दिवसांतच एफ आर पी देण्याच्या संदर्भात अत्यंत कडक व सक्त आदेश दिलेले आहेत ते आदेश महाराष्ट्र राज्यातील शेतकरी व शासन प्रशासनापर्यंत पोहचविण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी ,विभागीय आयुक्त तहसीलदार व महसूल पोलीस व महावितरण चे अधिकारी सर्व दूध संघ यांचे पर्यंत पोहचवून उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये बाबतची दक्षता घेण्यासाठी शासन प्रशासनाला निवेदन देण्याच्या कार्याला प्रारंभ करण्यात आला. यावेळी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी आयुक्त, वीज वितरण चे चीफ इंजिनिअर यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर पुण्यातील फुले वाड्यात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे दर्शन घेत एक दिवसातील निवेदन कार्यक्रम दौरा संपन्न झाला.
यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल पवार राजे, नवनिर्वाचित नाशिक जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब खैरनार, इगतपुरी तालुक्यातील शेतकरी जेष्ठ नागरिक आबाजी बारे, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांच्यासह संघटनेचे बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम