Nashik | सप्तशृंगगडाचा कायापालट होणार; ८२ कोटींचा निधी मंजूर

0
2

Nashik | आदिशक्तीच्या महाराष्ट्र राज्यातील साडेतीन शक्तीपिठांपैकी अर्ध शक्तीपीठ असलेल्या वणीच्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावरील विविध प्रलंबित विकास कामांसाठी राज्य शासनाने 82 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. ह्या निधीतून गडावर अद्ययावत बस स्थानक तसेच पोलिस स्टेशनसह भक्तनिवासांसारखे महत्वाचे प्रकल्प हे आता मार्गी लागत ह्या सप्तशृंग गडाचा रूप पालट होणार आहे.

Nagpur | आमदारांना हव्या ‘एसी’ खोल्या; नूतनीकरणावर कोटींचा खर्च

सप्तशृंगगड हे राज्यासह देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. शारदीय नवरात्रोत्सव तसेच चैत्रोत्सवात येथे मोठी यात्रा भरत असून वर्षभर याठिकाणी देवीच्या दर्शनासाठी संपूर्ण देशभरातून भाविक हे ह्या गडावर येत असतात. मात्र सोयीसुविधांच्या अभावामुळे भाविकांना याठिकाणी गैरसोयीचा सामना करावा लागतो. सप्तश्रृंगी गडावर पायाभूत सोयीसुविधा पुरवून पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी दिलेले होते.

त्यासाठी जिल्हा प्रशासनासह विविध यंत्रणांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना मुदत देण्यात आलेली होती. हा आराखडा अंतिम करण्यात आला असून राज्य सरकारने गडाच्या विकासासाठी ८१ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. या निधीतून गडावरील रस्ते, पथदीप, दरड प्रतिबंधात्मक उपाययोजना, हायमास्ट, डोम उभारणी, नक्षत्र बगीचा यांसारखे निरनिराळे प्रकल्प मार्गी लावण्यात येतील.

Unique Temple | एक अनोखं शिवमंदिर; जिथे शिवलिंग बदलते रंग अन् बेडूक करतो रक्षण 

या कामांमुळे गडाचं रुपडं पालटणार असून, भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत. गडावरील विकासकामांना गती देण्यासाठी सरकारने समिती गठीत केलेली आहे. जिल्हाधिकारी या समितीचे प्रमुख असणार आहेत. कामांकरीता लागणाऱ्या परवानग्या वनविभाग, पुरातत्व तसेच अन्य विभागांकडून घेण्याची जबाबदारी समितीवर असणार आहेत.

प्रस्तावित कामे 

नांदुरी येथील भक्तनिवास : ८५१.०२ (लाख)

गडावरील पोलिस ठाणे : ७७१.४१

नांदुरी बसस्थानक : ५५०.००

वीजवाहिन्या भूमिगत करणे : ५४४.४१

रस्ते, गटार : ४५९.६१

वनजमिनीवरील विविध कामे : ४३७.८२

गडावरील डोम : ३९१.५०

नक्षत्र बगीचा उभारणी : १९३.५०

दरड प्रतिबंधात्मक उपाययोजना : १९२.००

स्वच्छता गृह : १५२.३४


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here