Nashik | नाशिक शहरातील काही दिवसांपासून वातावरणातून गायब झालेली थंडी पुन्हा एकदा जाणवू लागलेली आहे. विशेषतः संध्याकाळनंतर वाहणाऱ्या गार वाऱ्यांमुळे नाशिककर गारठण्यास सुरवात झालेली आहेत. गुरुवारी (दि. १६) नाशिकचे किमान तापमान 14.2 अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. तर हे यंदाच्या हंगामातील निच्चांकी तापमान मानले जात आहे. तसेच कमाल तापमान 30.7 अंश सेल्सिअस राहिले.
Big News | राज्य सरकारची नवीन योजना; आता चट इंटरव्ह्यू आणि पट नोकरी
यंदाच्या हिवाळी हंगामात आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे थंडी जाणवत नव्हती. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गारठा जाणवू लागलेला असताना गेल्या 28 ऑक्टोबरला नाशिकचे किमान तापमान 14.5 अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. परंतु त्यानंतर सातत्याने पाऱ्यात वाढ नोंदविली गेली होती. कधी कडक ऊन तर कधी ढगाळ वातावरण यांमुळे शहराच्या वातावरणात थंडी जाणवत नव्हती. मात्र आता दिवाळीनंतर वातावरणात गारठा जाणवू लागलेला आहे.
Nashik News | चांदवडमध्ये २२ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त
गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने पाऱ्यात घसरण नोंदविली जात होती. गुरुवारी (दि. १६) नाशिकचे किमान तापमान 14.2 अंश सेल्सिअस राहिले. तर हे यंदाच्या हंगामातील निच्चांकी किमान तापमान आहे.
नाशिककरांना स्वेटर, जॅकेटसह कानटोपीचा आधार
सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी वातावरणातील गारव्यामुळे सावधगिरी म्हणून नागरिकांकडून स्वेटर, जॅकेटसह कानटोपीचा आधार घेतलेला पहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून कपाटात ठेवलेले स्वेटर, जॅकेट आता बाहेर निघताना दिसत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम