शहरात आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पावसाची संततधार; सर्वत्र विजांचा कडकडाट

0
29
पाऊस

नाशिक : गेल्या आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर आज शहरात ढगफुटीसदृश्य पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नाशिककरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

सध्या देशात परतीचा पाऊस असल्याने राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. त्यामुळे हवामान खात्याने काही दिवसांपूर्वी पाऊस पडण्याचा इशारा दिला होता. शहरात आज सकाळपासून वातावरणात उकाडा जाणवत होता. पण नंतर दुपारी अचानक ढग दाटून आले आणि दोन वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सीबीएस, शालीमार, रविवार कारंजा, पंचवटी, गंगापूर रोड व शहरातील इतर मुख्य परिसरात पावसाची संततधार झाली. त्यामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. पण ह्यामुळे नाशिककरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

तसेच, कालिकामातेच्या यात्रेसाठी आलेल्या भाविक व विविध स्टॉलधारकांचीही पावसामुळे चांगलीच धावपळ झाली. दरम्यान, मंदिर प्रशासनाने मंदिर परिसरात जरी वाॅटरप्रुफ मंडप उभारला असला, तरी मंदिराबाहेर मात्र साधा मंडप असल्यामुळे अनेक स्टॉलधारक विक्रेत्यांची बरीच आवराआवर करावी लागली.

दरम्यान, राज्यात पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मात्र, आता पुन्हा जोरदार पाऊस बरसत असल्यामुळे इथला बळीराजा चिंतेत पडला आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here