Nashik Rain Update | नाशिकमध्ये एक तासाच्या पावसातच उड्डाण पुलावरून कोसळले धबधबे

0
88
Nashik Rain Update
Nashik Rain Update

Nashik Rain Update :  गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाचा कहर बरसत असलेल्या नाशिकमध्ये अखेर पावसाचे (Rain) जोरदार आगमन झाले. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ग्रामीण भागात पाऊस बरसत असला तरी शहरात मात्र अद्यापही हवा तसा पाऊस झाला नव्हता. दरम्यान, आज अखेर नाशिककरांना उष्णतेपासून दिलासा मिळाला. तब्बल एक तास नाशिक शहरासह जवळील भागात पाऊस बरसत असल्याने नाशिकच्या मुंबई आग्रा महामार्गासह अन्य रस्त्यांवर (Mumbai-Agra Highway) पाणी साचले होते आणि या पाण्याने नद्यांचे रूप घेतले होते. (Nashik Rain Update)

Nashik news | मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण

दरम्यान, नाशिकमध्ये या पहिल्याच पावसाने सरकारी कारभाराचे डांबर उघडे पाडले. तर, दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (National Highway Authority) तडजोडी कारभारामुळे उड्डाणपूलावरील पाण्याचा नाचरा होत नसल्याने हे पावसाचे पाणी थेट उड्डाणपुलावरून खाली कोसळू लागले आणि धबधब्याच्या स्वरूपात हे पाणी पूलाखालील गाड्यांवर पडत होते. उड्डाणपूलाखाली अर्धवट अवस्थेत पाईप असल्याने पुलावरून पाणी खाली रस्त्यावर आणि रस्त्यावरील गाड्यांवर पडत होते. तर या पाण्यामुळे उड्डाणपुलाखाली काही वेळ वाहतूक कोंडीही झाल्याचे पहायला मिळाले. (Nashik Rain Update)

Nashik Citylinc | नाशिकची जीवनवाहिनी पुन्हा बंद..?


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here