नाशिक प्रतिनिधी – शहरात आज संध्याकाळपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर प्रचंड प्रमाणत पाणी साचले आहे.
शहरातील रविवार कारंजा, मालेगाव स्टँन्ड, सीबीएस, शालीमार आदी परिसरात पावसाचे पाणी साचल्याने अनेक ठिकाणी गणेश मंडळांचे देखावे पाण्याखाली गेले होते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी देखावे बघण्यासाठी आलेल्या भक्तांची हिरमोड झाली. शहरात आतापर्यंत ८० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी देखावे झाकण्यात आली होती, तर काही देखाव्यांमध्ये भाविकांची गर्दी कमी प्रमाणात होती. अनेक भाविकांची मात्र घरी जाण्यासाठी एकच धावपळ उडाली होती. रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचले होते, त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली होती. हवामान खात्याने शहरात येलो अलर्टचा इशारा दिला आहे, त्यामुळे उद्यादेखील पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम