नाशिक, प्रतिनिधी – श्रावण महिना सुरु होताच आज शहरात संध्यकाळी चारच्या सुमारास पावसाने जोरदार पुनरागमन केले. तब्बल दीड ते दोन तास चाललेल्या ह्या पावसाने काही दिवस उन्हाचे चटके सोसणाऱ्या नाशिककरांना दिलासा चांगला मिळाला आहे.
जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात सतत पडलेल्या पावसाने काही दिवसांपासून विश्रांती घेतली होती. त्यामुळे शहरात सर्वत्र उन्हाच्या झळा वाहत होत्या. ह्या पावसाच्या मोसमात शहराचे तापमान पार ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. आज झालेल्या पावसामुळे नाशिककरांना उन्हाच्या झळापासून मोठा दिलासा मिळाला आहे.
साधारणत: चार-साडेचारच्या सुमारास शहरात पावसाने दमदार हजेरी लावली. तब्बल दीड ते दोन तास पावसाचा कहर सुरु होता. शहरातील पंचवटी, रविवार कारंजा, द्वारका, गंगापूर रोड आदि भागात मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी वाहत होते. जवळपास १० मिमी पावसाची नोंद झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच येत्या २ ते ४ दिवसांत शहरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम