हौष्या नवश्यानी नदीकिनारी गर्दी टाळा; जिल्हाधिकाऱ्यांचा सतर्कतेचा इशारा

0
16

नाशिक: राज्यात सतत धार सुरू असून नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये मोठ्याप्रमाणावर पाऊस झाला आहे काही भागात अतिवृष्टी झाल्याने पुढील चार दिवसात जिल्ह्यात अतिप्रमाणावर पाऊस व अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने धरण प्रकल्पातून विसर्गही सुरू असून प्रसंगी विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने नदीकाठावरील सर्व नागरिकांनी सतर्क रहावे, तसेच नदीकाठावर पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.

यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्या मार्फत आलेल्या व्हाट्सअॅप संदेशानुसार गेल्या तीन ते चार दिवसात झालेला मुसळधार पाऊस व अतिवृष्टीमुळे तसेच भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस मुसधार पावसासोबत अतिवृष्टी होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यातील धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पावसाची तीव्रता वाढल्यास धारणांमधील विसर्गाचे प्रमाणही वाढविण्यात येईल. त्यामुळे नदीकाठावरिल नागरिकांनी सतर्क रहावे, तसेच नदीकाठी पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये असे आवाहनही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.

जिल्ह्यात आज दिवसभर सतत धार चालू असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे, ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. देवळा तालुक्यात गिरणेचा प्रवाह वाढल्याने शेतीचे नुकसान झाले आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here