Nashik Prahar | कलावंतांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आता लढणार प्रहार!

0
20
Nashik Prahar
Nashik Prahar

Nashik Prahar | जी व्यक्ती आपल्या अभिनयातून अनेक विविध अंगी रुपं सादर करते आणि त्यातील भावना त्यांच्या अभिनयातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याची क्षमता असणाऱ्या व्यक्तिला कलाकार म्हटले जाते. खऱ्या जीवनाच्या रंगमंचावर मात्र कलाकार सतत संकटाच्या वाटेवर चालताना दिसत असून याच कलाकारांच्या दु:खाला दुर करण्यासाठी अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना अनेक वर्षांपासून या कलावंताच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.

Manoj Jarange | दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री जरांगेंशी साधणार संवाद

अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेच्या माध्यमातून कलाकारांच्या विविध प्रश्नावर आवाज उठवून त्यांची मदत करुन कलेचा वारसा जिवंत रहावा यासाठी कार्य केले जाते. बच्चु भाऊ कडु हे अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेच्या माध्यमातून सध्या अखंड महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशातील कलाकारांना उभं करुन त्यांच्यासाठी लढत आहेत. याच अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेची संपूर्ण महाराष्ट्राची कार्यकारणी काल जाहीर झाली असून नाशिकमध्ये अखिल भारतीय चित्रपट संघटना नाशिक जिल्हाप्रमुख म्हणुन सिनेकलावंत किरण अनिल सोनवणे (अजिंक्य)या़ंची निवड करण्यात आली आहे.

Nashik Prahar | कोण आहेत किरण सोनवणे ?

किरण सोनवणे हे नाव नाशिक जिल्ह्यातील कलावंत क्षेत्रात आवर्जून घेतले जाते. यामागील कारण किरण सोनवणे हे गेली तिन ते चार वर्षापासून वेबसिरीज तसेच सिनेमांचा खडतर आणि यशस्वी प्रवास करुन तयार झालेले सशक्त असे अभिनेते आहेत. वेबसिरीज, शाँर्ट फिल्मच्या माध्यमातून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडलेली आहे.  एकांकिका ,नाटक, राज्यनाट्य स्पर्धा, शाँर्ट फिल्म, मराठी मालिका ‘रवका’ ‘अमावस्येची रात्र’ ‘अंटी आणि बंटी’ ‘क्राईम पेट्रोल’ यासारख्या हिंदी व मराठी मालीकांमधुन किरण सोनवणे यांनी अभिनय केला आहे, ‘डायमंड ऑफ महाराष्ट्र’ ‘मिस्टर महाराष्ट्र’ ‘चांदवडी रुपया’ ‘यंग ऍक्टर के आर ए’ इत्यादी पुरस्कार देखील यांना मिळालेली आहेत.

Petrol Breaking | पेट्रोल-डिझेल तुटवड्यामुळे शेतकरी, विद्यार्थ्यांना फटका

प्रहार चित्रपट संघटनेची राज्य कार्यकारणी पुढीलप्रमाणे जाहीर झाली असून महाराष्ट्र अध्यक्ष म्हणुन संदीप मोहीते पाटील, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सारंग महाजन, राज्य उपाध्यक्ष अमित मुळे, राज्य संपर्क प्रमुख संतोष लांडे व तेजस भंगाळे, राज्य संपर्क प्रमुख महीला आरती बनसोडे व कविता गायकवाड यांची प्रहार चित्रपट संघटनेची राज्य कार्यकारणीमध्ये निवड करण्यात आली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here