Nashik Politics | नाशिक जिल्ह्यातील ‘या’ सात जागांवर ठाकरे गट दावा करणार..?

0
69
Nashik Politics
Nashik Politics

Nashik Politics : नाशिक : उत्तर महाराष्ट्रात आणि विशेषतः कांदा पट्ट्यातील लोकसभा (Lok Sabha Election) मतदार संघांमध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. लोकसभा निवडणुकीत नाशिक लोकसभेवर पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा फडकला. तर, दिंडोरी लोकसभा शरद पवार गटाने आणि धुळे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने काबीज केला.

दरम्यान, यानंतर आता महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) पुन्हा एकदा नाशिककडे मोर्चा वळवला असून, शरद पवार (Sharad Pawar) आणि जयंत पाटलांनी (Jayant Patil) नाशिक (Nashik)  दौरा करत जिल्ह्यातील विधानसभा (Vidhan Sabha Election) मतदार संघांची चाचपणी केली आणि इच्छुकांच्या मुलाखती घेतल्याचे समजते.

Nashik Politics | ठाकरे गट नाशिकमधून फुंकणार आगामी निवडणुकांचे रणशिंग

Nashik Politics | नाशिक हा अजित पवार गटाचा बालेकिल्ला 

दरम्यान, यानंतर आता ठाकरे गटानेही (Shiv Sena UBT) नाशिकमधील विधानसभा मतदार संघांची चाचपणी सुरू केली असून, ठाकरे गटाचे नेते रवींद्र मिर्लेकर हे नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघांचा आढावा घेत आहेत. नाशिक जिल्ह्यात एकूण 15 विधानसभा मतदारसंघ असून, यापैकी 6 आमदार हे अजित पवार गटाकडे, 5 आमदार भाजपकडे, 2 आमदार शिंदे गटाकडे, 1 कॉंग्रेस, आणि एक एमआयएम कडे आहे. सर्वाधिक आमदार असल्याने नाशिक हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो.

शिवसेना आणि राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे 6 आमदार अजित पवार गटात तर, शिवसेनेचे 2 आमदार आणि 1 खासदार हे शिंदे गटासोबत गेले. त्यामुळे ठाकरे गट, शरद पवार गटाचा नाशिकमध्ये एकही आमदार नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या निकालानुसार नाशिकच्या मतदारांचा कौल हा महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचे दिसून आले.(Nashik Politics)

Nashik Vidhansabha | युवा पिढीलाही आमदारकीचे डोहाळे; नाशिकमधील ‘या’ मतदारसंघांत बाप-लेकातच लढत..?

‘या’ मतदार संघांवर ठाकरे गट करणार दावा..?

त्यामुळे नाशिकच्या जागांबाबत चाचपणी सुरू असून, ठाकरे गट कोणत्या जागांवर दावा करू शकतो. याबाबत माहिती समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदार संघांपैकी येवला, मालेगाव बाह्य, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, नाशिक मध्य, इगतपुरी, सिन्नर या सात मतदार संघांमध्ये ठाकरे गटाची ताकद असून ठाकरे गटाकडून आढावा घेतला जात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून या सातही मतदार संघांवर दावा केला जाऊ शकतो. (Nashik Politics)

लोकसभेला चांगले यश मिळाले; नाशिकमध्ये ठाकरे गटाची ताकद 

नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघांमध्ये ठाकरे गटाचे नेते रवींद्र मिर्लेकर हे विधानसभा निहाय चाचपणी करत आढावा बैठका घेत आहेत. जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांचा ठाकरे गटाकडून आढावा घेतला जात आहे. आम्हाला नाशिक लोकसभेला चांगले यश मिळाले असून, नाशिकमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची ताकद आहे. मात्र तिन्ही पक्षांची आघाडी असल्याने जागावाटपाबाबत चर्चा करूनच निर्णय होईल, असे रवींद्र मिर्लेकर यांनी सांगितले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here