Nashik Political | रिपाइं आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष रत्नाकर पगारे यांनी दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांना पाठिंबा दर्शवत, “दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघात नरहरी झिरवाळ यांनी विकास कामे करताना कधीच जातीपातीचा विचार केला नाही. त्यांनी नेहमी सर्व जाती-धर्माला न्याय दिला आहे. संतोष लोखंडे यांनी झिरवाळांकडूनच विकासकामे करून घेतली आहेत आणि आता झिरवाळांविरोधातच विरोधात बोलत आहेत. परंतु झिरवाळ पुन्हा आमदार झाल्यास आंबेडकरी जनतेला न्याय मिळणार आहे. तेव्हा कुठल्याही भुलीला बळी न पडता आंबेडकरी जनता झिरवाळांच्या पाठीशी उभी राहील” असा प्रतिवाद केला आहे.
Nashik Political | बंडूकाका बच्छावांना मोठा धक्का; राजेंद्र देवरे यांची शिंदेच्या शिवसेनेत घरवापसी
रिपाइं आणि रामदास आठवले महायुतीसोबत
“संतोष लोखंडे हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. पण जो निळा झेंडा घेऊन लढतो. तो आंबेडकरी जनतेचा व रिपाइंचा कार्यकर्ता निष्ठावान असतो. रिपाइं कार्यकर्ता हा आंबेडकरवादी आहे व नरहरी झिरवाळ हे रिपाइं महायुतीचे उमेदवार म्हणून उभे आहे. त्यामुळे रिपाइं आणि रामदास आठवले हे झिरवळ्यांच्या सोबत आहेत. मग यात आपल्याला का वाईट वाटते? असा सवाल उपस्थित करत नरहरी झिरवाळ हे एका समाजाचे नेते नसून आज त्यांना सर्वच समाज घटकांकडून पाठिंबा मिळत आहे. रिपाइंची मोठी ताकद दिंडोरी आणि पेठेत आहे. कित्येक मागासवर्गीय मुलांना झिरवाळ यांनी नोकर भरतीत मदत केली असून अनेक दलित विद्यार्थ्यांना समाज कल्याण वसतिगृहामध्ये प्रवेश मिळवून दिले आहेत.”
पगारेंकडून झिरवळांच्या कामाचे कौतुक
पुढे बोलत, “झिरवळांनी दिंडोरी तालुक्यात समाज कल्याण विभागाचा लाखो रुपयांचा निधी आणला असून त्यातून दलित वस्तीमध्ये कामे सुरू केली. दिंडोरी सारख्या शहरात 12 कोटी रुपयांचे भव्य असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ध्यान केंद्र पॅगोडा मंजूर केले. तसेच पूर्व भागात त्यांनी अनेक ठिकाणी बुद्ध विहारमंजूर केलेच त्याचबरोबर ननाशी सारख्या दुर्गम भागात देखील बुद्ध विहारासाठी 85 लाखांचा निधी मंजूर केला. सर्व समाजाला धरून चालणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे नरहरी झिरवाळ. त्यामुळे सर्व आंबेडकरी जनतेवर झिरवळांची वेगळी छबी निर्माण झाली आहे. तेव्हा या निवडणुकीत आंबेडकरी जनता भुजबळांच्या पाठीशी बहुसंख्येने उभी राहील हे सांगायची गरज नाही.” असे सांगितले.
Nashik Crime | नाशकात नाकाबंदीदरम्यान 33 लाख रुपयांची रक्कम जप्त
महाविकास आघाडीच खरी जातीयवादी आहे
तसेच, “निकालानंतर आंबेडकरी जनतेचे मतदान लक्षात येईलच नरहरी झिरवळांनी आंबेडकरी जनतेच्या वस्त्यांचा विकास करून दाखवला आहे. केंद्रात रिपाइं सहभागी असलेले सरकार आहे. राज्यात महायुतीचे सरकार येणार असून आंबेडकरी समाजाचा विकास करायचा असेल तर आपल्याला सत्ते सोबत राहूनच ते करता येईल. तेव्हा रिपाइं महायुती बरोबरच आहे. त्यामुळे सर्वांना न्याय देणाऱ्या घड्याळाच्या निशाणी समोरील बटन दाबून जनता झिरवाळ यांना प्रचंड मतांनी विजयी करेल असा विश्वास आहे. मी कार्यकर्ता आहे. परंतु रिपाइंचा जिल्हा उपाध्यक्ष देखील आहे. त्यामुळे मी रिपाइंची भूमिका स्पष्टपणे मांडत आहे व यापुढेही मांडत राहणार आहे. काँग्रेस व महाविकास आघाडीच खरी जातीयवादी आहे. त्यांनी गोड बोलून खोड मोडली असून महायुती सरकारने आंबेडकरी जनतेला सांभाळले आहे. तेव्हा सर्वांनी झिरवाळ यांनाच निवडून आणावे.” असे आवाहनही त्यांच्याकडून करण्यात आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम