Nashik Political | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात काँग्रेस उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर नाशिक मध्य व इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघात पक्षांतर्गत बंडखोरीचे सूर ऐकू येऊ लागले असून नाशिक मध्य मधून काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील पक्षाकडून व अपक्ष तसेच काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे हनीफ बशीर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. इगतपुरी-त्रंबकेश्वर मतदारसंघातून देखील उषा बेंडकोळी, निर्मला गावित, गोपाल लहांगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
Nashik Political | तिसऱ्या आघाडीकडून गुरुदेव कांदे यांनी निफाड मतदारसंघातून भरला उमेदवारी अर्ज
उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये धुसफुस
नाशिक मध्ये मधून महाविकास आघाडीने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार माजी आमदार वसंत गीते यांना पक्षाने एबी फॉर्म देऊन रिंगणात उतरवले. परंतु हा मतदारसंघ काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असताना देखील तो शिवसेनेने हिसकावून घेतला. त्यामुळे स्थानिक काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. प्रदेश प्रवक्ते डॉ. पाटील यांनीही पक्षाने उमेदवारी द्यावी अन्यथा पक्ष लढणार असल्याची भूमिका घेतली आहे. प्रदेश काँग्रेसकडून अद्याप कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे सोमवारी त्यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले असून अल्पसंख्यांक विभागाचे हनीफ बशीर यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे इगतपुरी-त्रंबकेश्वर मतदारसंघातही उमेदवारी दिलेले लकी जाधव यांच्या विरोधात स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बंड पुकारण्यात आले असून यात पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत उमादवार बदलण्याची मागणी केली आहे. तसेच इच्छुक असलेल्या उषा बेंडकोळी तसेच माजी आमदार गावित यांनी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
पक्ष नेतृत्वाचा निषेध नोंदविण्यासाठी दाखल केले उमेदवारी अर्ज
नाशिक मध्यच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही होते. परंतु ती मिळाली नसल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज आहेत. पक्ष नेतृत्वाचा निषेध नोंदविण्यासाठी माझ्यासह आणि बशीर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले. त्यांच्या सोमावेत माजी नगरसेवक केशव पाटील, सुरेश मारू, माजी नगरसेविका वत्सला खैरे इत्यादी उपस्थित होते. शहराध्यक्ष ॲड. आकाश झाडे, निर्धार मेळावा घेणारे प्रदेश सचिव राहुल दिवे यांच्यासह अनेक पदाधिकारी मात्र अनुपस्थित होते. याउलट काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र बागुल, महाविकास आघाडीचे वसंत गीते त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी त्यांच्या समवेत उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम