Nashik Political | तिसऱ्या आघाडीकडून गुरुदेव कांदे यांनी निफाड मतदारसंघातून भरला उमेदवारी अर्ज

0
29
#image_title

Nashik Political | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निफाड मतदारसंघातून सोमवार दि. 29 ऑक्टोबर रोजी हजारो नागरिक व समर्थकांचे शक्तीप्रदर्शन दाखवत प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार व परिवर्तन महाशक्ती आघाडीचे गुरुदेव द्वारकानाथ कांदे यांनी दुपारी 12 वाजता निफाड प्रशासकीय निवडणूक निर्णय अधिकारी हेमांगी पाटील यांच्याकडे आपला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरदराव शिंदे, रिपब्लिक काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष पांडुरंग पगारे, शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष संजय पाटोळे, गणेश डेरे, प्रहार जिल्हा प्रमुख विलासराव अंडागळे, चापडगाव माजी सरपंच बबनराव दराडे, नांदूर खुर्द माजी सरपंच हरिभाऊ कुशारे, खेडे माजी सरपंच राजेंद्र सांगळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Nashik Political | बबनराव घोलप यांची कन्येला कायदेशीर नोटीस; आपल्या नावाचा वापर न करण्याचा दिला इशारा

“गुरुदेव कांदे उमेदवार नसून तुम्ही सर्व उमेदवार आहात”

अर्ज दाखल करताना गुरुदेव कांदे यांनी नागरिकांना व समर्थकांना संबोधित करत, “आजी-माजी आमदारांना जनता कंटाळली असून जनतेला सक्षम पर्याय हवा आहे आणि तो पर्याय जनतेने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यात पाहिला असून जनतेच्या आशीर्वादाने पीडित, शोषित, वंचित, मजूर, दिव्यांग, कष्टकरी कामगार, शेतकरी, व्यावसायिक या सर्वांच्या आशीर्वादाने तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू, शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजी राजे, रिपब्लिकन ऑफ इंडियाचे प्रमुख राजरत्न आंबेडकर, अर्जुन तात्या बोराडे यांच्या पाठिंब्याने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सर्वसामान्यांचा आवाज विधानसभेत पोहोचवण्यासाठी हा उमेदवारी अर्ज आहे. त्यामुळे गुरुदेव कांदे हा उमेदवार नसून तुम्ही सर्व उमेदवार आहात.” असे ते यावेळी म्हणाले.

“आपल्याला जनता विधानसभेत पाठवल्याशिवाय राहणार नाही”

तेव्हा या दृष्टीने आपल्याला ही निवडणूक लढवावी लागणार आहे. आज निफाड तालुक्याला देशाचा कॅलिफोर्निया म्हटले जाते. परंतु या तालुक्यात कर्मवीरांच्या त्यागातून उभा राहिलेला रासाका, निसाका, नाशिक जिल्हा बँक, नांदूरमधमेश्वर धरण व रामसर दर्जा असलेल्या तेथील पक्षी अभयारण्याचा पर्यटन स्थळाचा न झालेला विकास, शिवार रस्ते तालुक्यातील तीन महत्त्वाच्या ठिकाणी असलेली उड्डाणपुले, दोन्ही बाजारात समित्या, तरुण बेरोजगार युवकांना मोठी औद्योगिक वसाहत नसल्याने हाताला काम नाही. परंतु आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी, राजकारणासाठी जनतेला गृहीत धरून काम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना यापुढे जनता थारा देणार नाही. सर्वसामान्यांचे उमेदवार म्हणून आपल्याला या निवडणुकीत जनता विधानसभेत पाठविल्याशिवाय राहणार नाही.” असा आत्मविश्वास त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना व्यक्त केला आहे.

Nashik Political | राष्ट्रवादीकडून पुन्हा दिलीप बनकरांना संधी; भाजपाच्या यतीन कदमांचा हिरमोड

“सर्वांनी गुरुदेव कांदे यांना पाठिंबा द्यावा”- पांडुरंग पगार

तर गुरुदेव कांदे यांना पाठिंबा देणाऱ्या रिपब्लिक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पांडुरंग पगारे यांनी, “गोरगरीब विचारांचा माणूस म्हणून निफाड तालुक्यातील सर्वसामान्य जनता गुरुदेव कांद्यांकडे पहाते आहे. तेव्हा दोघात तिसरा चेहरा जनतेने व आम्ही सक्षम पर्याय म्हणून उभा केला आहे. असे म्हणत, तो 20 नोव्हेंबर रोजी प्रचंड मताधिक्याने निवडून येणार आहे. निसाका व रासाका यांची लागलेली वाट जनतेने पाहिली आहे. आजी-माजी आमदार या कामे अपयशी ठरले असून त्यामुळे, या दोन्ही कारखान्यांना सुगीचे दिवस आणण्यासाठी व परीणामी तालुक्याचा विकास करण्यासाठी गुरुदेव कांदे हा पर्याय आपल्याला उपलब्ध झाला आहे . तेव्हा त्यासाठी सर्वांनी एकत्र येत गुरुदेव कांदे यांना पाठिंबा द्यावा.” असे आवाहन यावेळी पगारे यांनी केले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here