Nashik Political | राष्ट्रवादीकडून पुन्हा दिलीप बनकरांना संधी; भाजपाच्या यतीन कदमांचा हिरमोड

0
40
#image_title

Nashik Political | अखेर निफाड मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा सुटला असून राष्ट्रवादीच्या अजित पवार पक्षाकडून विद्यमान आमदार दिलीप बनकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपाचे यतीन कदम यांचे स्वप्न मात्र भंगले आहे.

Nashik Political | नाशिकमध्ये काँग्रेसला एक ही जागा न मिळाल्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ठोकले काँग्रेस कार्यालयाला टाळे..

दिलीप बनकरांना दिलेसा

रविवार दि. 27 ऑक्टोबरच्या सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची तिसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये निफाड मतदारसंघातून दिलीप बनकर यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील मिळाला आहे. या जागेवर भाजपच्या यतीन कदम यांच्याकडून केला होता. त्यांनी अजित पवारांची भेट घेत आपल्या पक्षाकडून उमेदवारी द्यावी अथवा भाजपला ही जागा सोडावी. असा आग्रह धरला होता. अजित पवार पक्षाच्या पहिल्या दोन याद्यांमध्ये निफाड मतदारसंघाच्या जागेचा उल्लेख नव्हता. त्यामुळे बनकर यांच्या उमेदवारी विषयी प्रश्नचिन्ह होते. परंतु तिसऱ्या यादीत नाव जाहीर झाल्यानंतर बनकर यांना दिलासा मिळाला आहे.

उमेदवारी मिळेल असा होता विश्वास

दिलीप बनकर हे अजित पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पहाटेच्या शपथविधीपासून ते महायुतीत सहभागी होताना ते आघाडीवर होते. सर्व आमदारांना उमेदवारी दिली असताना बनकर यांना प्रतीक्षेत ठेवले होते. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. परंतु आपल्याला उमेदवारी नक्की मिळेल असा विश्वास बनकर यांच्याकडून व्यक्त केला जात होता.

Nashik Political | नाशिक पूर्व मध्ये भाजपला फटका; भाजपला राम राम ठोकत गणेश गीते तुतारी फुंकणार!

राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाने नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, सिन्नर, येवला, कळवण, देवळाली या मतदारसंघातून विद्यमान आमदारांना यापूर्वी उमेदवारी जाहीर केली असून तिसऱ्या यादीत निफाडसह फलटणमधून सचिन पाटील पारनेरमधून काशिनाथ दाते तर गेवराईतून विजयसिंह पंडित यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here