Deola | भावडे येथील एसकेडी विद्यालयात राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात संपन्न

0
65
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | राज्य क्रीडा युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या आदेशान्वये एसकेडी इंटरनॅशनल स्कूल व व्ही.के.डी. इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भावडे, येथील मैदानावर राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन चॅम्पियन स्पर्धांच्या उद्घाटनाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे, सचिव मीना देवरे, नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, भाऊसाहेब जाधव, महेश पाटील, अविनाश टिळे, संदीप ढाकणे, प्रीती कारवार, नेहा सुरणार, उत्तरा खानपुरे, शरदचंद्र वाबळे निरीक्षक मुंबई, राजेश्वर खंगार तांत्रिक समिती बुलढाणा, दीपक खरात मुख्यपंच सुनील देवरे , तुषार देवरे , प्राचार्य एस. एन, पाटील, प्राचार्य एन.के. वाघ, मंगेश शिंदे, सागर कैलास, बबलू देवरे आदी उपस्थित होते.

Deola | देवळ्यात मोठी राजकीय उलथापालथ!; केदा आहेर तुतारी फुंकणार…?

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन

यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे विद्यालयाच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सहभागी सर्व खेळाडूंनी मशाल प्रज्वलन करून संचलन केले. एस.के.डीचे अध्यक्ष संजय देवरे यांनी खेळाचे देशाच्या विकासातील, वैयक्तिक जीवनातील महत्त्व पटवून सांगितले.

Deola | उत्पन्न दाखल्यावर छेडछाड करून नॉन-क्रिमेलयर प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याप्रकरणी सेतू केंद्र चालकावर गुन्हा दाखल

विजेत्या व उपविजेत्या संघांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते चॅम्पियन ट्रॉफी

या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील आठ विभागातून सतरा वर्षाच्या आतील मुलींचे आठ व सतरा वर्षाच्या आतील मुलांचे आठ अशा एकूण सोळा संघांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेंती 17 वर्षाखालील मुलींच्या बॉल बॅडमिंटन स्पर्धेत पुणे विभागाने अंतिम सामना जिंकून प्रथम क्रमांक पटकावला व लातूर विभागाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. 17 वर्षाखालील मुलांच्या बॉल बॅडमिंटन स्पर्धेत छत्रपती संभाजी नगरविभागाने प्रथम क्रमांक पटकावत नाशिक विभागाला उपविजेते पद मिळाले. सर्व विजेत्या व उपविजेत्या संघांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते चॅम्पियन ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. सदर स्पर्धांच्या आयोजनासाठी स्पर्धेचे आयोजक व विद्यालयाचे क्रीडाशिक्षक यज्ञेश आहेर, मुदस्सर सय्यद, निलेश भालेराव, धनंजय परदेशी, सुशांत बागुल, राजू देवरे यांचे मार्गदर्शन लाभले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here