Dada Bhuse | दादा भूसेंना आशीर्वाद देण्यासाठी लाखोंचा जनसागर रस्त्यावर 

0
39
Dada Bhuse
Dada Bhuse

Dada Bhuse | राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे हे आज मालेगाव बाह्य मतदार संघातून आपला उमेदवारी आज दाखल करीत आहेत. यावेळी भव्य अशा रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, या रॅलीला छत्रपती शिवाजी महाराज स्मारक (शिवतीर्थ) येथून सकाळी ११:३० वाजता सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होत दादा भुसे यांनी उमेदवारी अर्जाच्या रॅलीला सुरुवात झाली.

Dada Bhuse | लाखोंचा जनसागर रस्त्यावर 

दादा भुसे हे गेल्या २० वर्षांपासून मालेगाव बाह्य मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असून, प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या उमेदवारी अर्जाच्या रॅलीस मोठ्या संख्येने मालेगावकर त्यांना आशीर्वाद देण्यासाठी रस्त्यावर उतरतात. हीच परंपरा यंदाही मालेगावच्या जनेतेने कायम ठेवली असून, आजही लाखोंचा जनसागर दादा भुसे यांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे. रॅलीच्या मार्गावरील सर्व रस्त्यांवर तूफान गर्दी असून, मोसमपुल संगमेश्वर येथून तब्बल 8 ते 10 किमी अंतरापर्यंत रस्ते जाम आहेत.

Dada Bhuse | ‘बापाची औलाद असशील तर दाखव पेनड्राईव्ह’; भूसेंचे विरोधकांना खुले आव्हान

जिल्ह्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत दादा भुसे पाचव्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. तरी आज वासुबारसच्या मुहूर्तावर ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. भुसे यांच्यासमोर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे आणि अपक्ष उमेदवार बंडूकाका बच्छाव यांचे आव्हान असणार आहे. तरी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अद्वय हिरे यांनी त्यांच्या जाहीर सभेत दादा भुसे यांच्यावर जहरी टिका केली होती. त्यानंतर दादा भुसे यांनी मालेगावच्या जनतेची परवानगी मागत आपण २८ तारखेच्या सभेत बोलणार असल्याचे म्हटले होते.

भुसे काय बोलणार..? कोणावर तोफ डागणार..?

त्यामुळे आता रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आजच्या जाहीर सभेत दादा भुसे काय बोलणार..? कोणावर तोफ डागणार..? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. आजच्या भुसे यांच्या रॅलीसाठी शिवसेना नेते रामदास कदम, शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे, शिवसेना सचिव सुशांत शेलार हे उपस्थित राहणार आहेत.

Dada Bhuse | ‘या वाचाळ वीरांनी स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला’; भूसेंकडून हिरेंचा समाचार


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here