Nashik Political | ठाकरे गटाचं ठरलं?; उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच एबी फॉर्मसचे केले वाटप

0
67
#image_title

Nashik Political | विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होताच, राज्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यात निवडणुकीची रणधुमाळी कालपासूनच सुरू झाली असून दि. 22 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल भरण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे महायुतीच्या घटक पक्षांकडून उमेदवार यादी जाहीर झाली असून महाविकास आघाडीचे जागावाटप अद्यापही गुलदस्त्यात आहे. परंतु मविआकडून नाशकात संभाव्य उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे.

Nashik Politics | नाशिक मध्य मतदारसंघाचा तिढा सुटेना; देवयानी फरांदेंच्या अडचणींत वाढ!

उद्धव ठाकरे गटातील उमेदवारांना एबी फॉर्मसचे वाटप

महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून नाशिक जिल्ह्यातील 15 पैकी काही मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये नाशिक मध्य मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी आमदार वसंत गीते यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. तर नाशिक पश्चिम मधून सुधाकर बडगुजर यांना एबी फॉर्म मिळाला आहे. त्याचबरोबर मालेगाव बाह्य मतदारसंघातून अद्वय हिरे यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून एबी फॉर्म मिळाला आहे. अद्वय हिरे महायुतीच्या दादा भूसें विरोधात निवडणूक लढवणार आहेत.

Nashik Political | नाशिक पश्चिममध्ये भाजपला फटका; बंडखोरी अटळ?

‘मविआ’कडून नाशिक मध्यची उमेदवारी निश्चित? 

तर नांदगावमधून गणेश धात्रक यांना एबी फॉर्म देण्यात आला असून धात्रक शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदेंविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. याशिवाय निफाड मधून माजी आमदार अनिल कदम यांना एबी फार्म मिळाला असून येवल्यातून कुणाल दराडे यांना एबी फॉर्म देण्यात आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये नाशिक मध्येच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटात तिढा असताना वसंत गीते यांना एबी फॉर्म देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात ही जागा ठाकरेंच्या वाट्याला आल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच काल वसंत गीते यांनी मतदारसंघात प्रचाराला देखील सुरुवात केली होती. मात्र आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून वसंत गीतेंना एबी फॉर्म मिळाल्याने त्यांची उमेदवारी एक प्रकारे निश्चित मानली जात आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here