Nashik Political | नाशिक पूर्व मधून भाजपाला धक्का; बडा नेता फुंकणार तुतारी?

0
97
#image_title

Nashik Political | राज्यात विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांच्या याद्या अंतिम केल्या जात आहेत. त्यात युतीतील घटक पक्ष भाजपकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यानंतर बरीच रासमीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तसेच आता नाशिकमध्ये भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Nashik Political | नांदगावच्या जागेवरून महायुतीत वाद; उमेदवारीची मागणी करत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देवगिरीवर

ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपची पंचाईत

भाजपाचे माजी नगरसेवक व दोनदा सभापती असलेला नाशिक पूर्व मधील बडा नेता आज दुपारी 12 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपाचा हा बडा नेता नाशिक पूर्व मधून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होता. परंतु पक्षाने या ठिकाणी विद्यमान आमदार राहुल ढिकले यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केल्यामुळे हा दिग्गज नेता नाराज झाल्याची चर्चा होत असून या नेत्याने आता विविध पक्षांकडून उमेदवारीसाठी चाचपणी सुरू केली असल्याचे बोलले जात आहे. तसेच त्याला यामध्ये यश आल्याची माहिती आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर या नेत्याला त्या पक्षाकडून नाशिक पूर्व मधून विधानसभेचे उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भाजपची ऐन निवडणुकीच्या तोंडावर पंचाईत होण्यार असल्याचे चित्र आहे. तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून या नेत्याला उमेदवारी मिळाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार राहुल ढिकले यांना तगडी टक्कर मिळण्याचा अंदाज आहे.

Nashik Political | देवळाली मतदारसंघात शिंदे गटाला खिंडार; ‘या’ नेत्याने केला पक्षप्रवेश निश्चित

देवळाली मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीला

भाजपच्या नेत्या व नाशिकच्या माजी तहसीलदार राजश्री आहिरराव या देखील शरद पवारांचे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता असून राजश्री आहिरराव या देवळाली विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होत्या. परंतु महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या मिळणार असल्याकारणाने या ठिकाणाहून पुन्हा एकदा विद्यमान आमदार सरोज आहिरे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे अहिरराव यांचा हीरमोड झाला असून त्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here