Nashik news | मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या सभा आणि दुसरीकडे ओबीसी आरक्षण बचाव यासाठी होणारे मेळावे, या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान अथवा जातींमध्ये वाद निर्माण करण्याचे प्रयत्न समाज माध्यमांद्वारे होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन घोटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद पाटील व वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक समीर बारावकर यांनी केलेले आहे.
गावोगावी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, याची नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, समाज माध्यमांद्वारे येणाऱ्या संदेशांकडे दुर्लक्ष करून दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही,
अशी भूमिका इगतपुरीसह सर्व तालुक्यांतील नागरिकांनी घ्यावी व पोलीस प्रशासनाला सहकारी करावे, असे आवाहन पाटील व बारावकर यांनी केलेले आहे. जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांच्या विरोधात सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. राष्ट्रविरोधी प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.
Crime news | हातपाय धुण्यासाठी धरणात गेले अन दोन दिवसांनी सापडला मृतदेह
शहरातील आणि ग्रामीण भागातील समाज माध्यमांवरील गटांमध्ये कुठलाही समाज किंवा जातीबद्दल संदेश पसरविण्यात येणार नाही, यावर पोलीस प्रशासन व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष राहणार आहे. गावांत येणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना गाव बंदी, वाईट बोलणे किंवा जातीय संदेश पसरविणे हा कायद्याने गुन्हा ठरवला जाईल.
तरुणांनी कुठल्याही परिस्थितीत आपले कुटुंब आणि आपले भविष्य हे समाजकंटकांमुळे वाया जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. आपले गाव व परिसरात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडवण्यासाठी कोणीही पुढाकार घेत असेल तर त्याचा फोटो काढून थेट स्थानिक पोलीसांशी संपर्क साधावा. पोलीस यंत्रणेकडून संबंधिताचे नाव हे गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन पोलीस निरीक्षक पाटील तसेच सहायक निरीक्षक बारावकर यांनी केले आहे.
इगतपुरी तालुका हा मुंबई, नाशिकजवळ असल्यामुळे समाजकंटक हे युवकांची माथी भडकवून राष्ट्रीय हिताला बाधा पोहचवत राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करू शकतात. त्यामुळे सर्वांनी दक्ष राहून समाज व राष्ट्राचे हित डोळ्यासमोर ठेउनच उभे राहण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम