नाशिक मनपाच्या नव्या आयुक्तपदी चंद्रकांत पुलकुंडवार; आज पदभार स्वीकारणार

0
10

नाशिक – काल राज्य सरकारने उद्धव ठाकरेंचे निकटवर्ती मानले जाणारे नाशिक महानगपालिकेचे आयुक्त रमेश पवार यांची बदली झाली. आता त्यांच्या जागी रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती केली आहे. आज शनिवारी ते आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

सरकार बदलल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या ह्या आता नव्याने राहिलेल्या नाही, त्यामुळे रमेश पवार यांची बदली ही अटळ मानली जात होती. काल राज्य सरकारने यासंदर्भात बदलीचे आदेश काढले आणि त्यावर शिक्कामोर्तब झाले. रमेश पवार यांना केवळ पाच महिन्यांचा कार्यकाळ लाभला. ते मार्च २०२२ पासून नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावर होते.

याआधी तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांची विधान परिषदेतील चर्चेनंतर बदली होताच मुंबई महापालिकेचे सहआयुक्त असलेले पवार यांना थेट ब दर्जाच्या महापालिका आयुक्तपदी नेमले होते. यामुळे बराच वाद झाला होता. आयएएस केडर नसतानाही त्यांची थेट नियुक्ती करण्यात आली, असा आक्षेप घेतला होता. त्यामुळे पवार यांच्या बदलीची चर्चा सुरू होती, ती अखेर खरी ठरली. गेल्या दोन-अडीच वर्षात नाशिक महापालिकेला अनेक आयुक्त लाभले आहे, यामुळे आता दीर्घकालीन आयुक्त शहराला लाभावा, असे मत अनेक अधिकारी व लोकप्रतनिधींनी व्यक्त केली.

नव्या आयुक्तांचा अल्प परिचय

मूळचे नांदेडचे रहिवासी असलेले नवे महापालिका आयुक्त डॉ. पुलकुंडवार हे १९९३ मध्ये शासकीय सेवेत रुजू झाले. त्यांनी अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना २००८ ते २०१० पर्यंत मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून काम केले आहे. त्यांनी आतापर्यंत यवतमाळ, अमरावतीतील मेळघाट, नंतर जालना येथेही विविध पदांवर काम केले आहे. ते नांदेड महापालिकेच्या उपायुक्तपदी ही राहिलेले आहे. २१ मार्च २०१६ रोजी त्यांची भारतीय प्रशासन सेवेत निवड झाली. त्यानंतर ५ मे २०१८ पासून आतापर्यंत रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकपदावर कार्यरत होते. त्यांचे मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे पदवीपर्यंत शिक्षण झाले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here