Nashik News | नाशिक विकायचं आहे! सोशल मीडियावर पोस्ट झाली व्हायरल

0
17

Nashik News | दिवाळीच्या सणानिम्मित सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच सोशल मीडियावरून सध्या नाशिक विकायचे आहे? अशी जाहिरात प्रसिद्ध केली जाते आहे. या माध्यमातून नेटकरी नाशिकमधील पायाभूत सुविधांचा प्रश्न मांडत आहेत तसेच नाशिकमधून पळविले जात असलेल्या प्रकल्पांवर बोट ठेवत आहेत. याबाबत लोकप्रतिनिधींना जबाबदार धरले जात असून, एक्स (Twitter) वर टॅग केले जात आहे.

Maratha Reservation | जरांगेंची तोफ नाशकात धडाडणार; सर्वपक्षीय नेतेही एकत्र येणार

मुंबई-पुणेप्रमाणे नाशिकला खमके राजकीय नेतृत्व नसल्याने शासनदरबारी एखादी समस्या सोडविण्यासाठी नाशिककरांना पराकाष्ठा करावी लागते. एखाद्या मोठ्या प्रकल्पासाठी शासनदरबारी झगडणारं नेतृत्व नाही किंवा दूरदृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करणारा प्रकल्प आणणारे नेतृत्वही नाही, अशी खंत अनेक वर्षांपासून नाशिककर व्यक्त करत आहेत. आता ही खंत थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्रमकपणे मांडली जाते आहे.

Government Scheme | सरकारची महिलांसाठी खास योजना

ऐन दिवाळीत नेटकऱ्यांनी ‘नाशिक विकायचे आहे’ अशी जाहिरात करून लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेवरच बोट ठेवण्यात आलेलं आहे. भाजपची सत्ता असताना 2017 मध्ये मोठी आश्वासन दिली गेली. राज्य शासनात प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी नाशिकसाठी मोठी आश्वासने दिली. त्या आश्वासनांचा विसर पडल्याचे नेटकरी एक्स (Twitter) वरून सांगत आहेत. नाशिक-मेट्रो प्रकल्पाची घोषणा झाली आणि अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. मात्र अद्यापही कामे न झाल्याने नाशिककरांच्या तोंडाला पाने पुसली गेल्याचा आरोप होत आहे. नाशिक-मुंबई महामार्गाचे विस्तारीकरण असो किंवा नाशिक-पुणे महामार्गाचे सहापदरीकरण येथील समस्यांवर बोट ठेवताना प्रकल्प का झाले नाहीत, असा सवाल नेटकऱ्यांकडून केला जातो आहे. त्यामुळे अखेरीस संतप्त नेटकऱ्यांनी नाशिक विकायचे आहे, अशी जाहिरात करत लोकप्रतिनिधींचा निषेध केला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here