Nashik News | नाशकात नवरात्रोत्सवासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

0
38
#image_title

Nashik News | नाशिक शहरात पोलिसांनी नवरात्रोत्सवासाठी बंदोबस्ताचे नियोजन केले असून त्यानुसार शहरातील कालिकादेवी आणि रेणुका देवी यात्रेत मंदिरासमोरील जागेत तात्पुरत्या स्वरूपात नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहेत. तसेच गर्दीतील भुरट्या चोरांवर नजर ठेवण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांची गस्त तैनात असणार आहे.

Nashik News | आदिवासी विकास विभाग आश्रमशाळांमध्ये भौतिक सुविधा तपासणी मोहीम राबवणार

नवरात्रोत्सवार पोलिसांची करडी नजर

तर पोलिसांकडून नवरात्रोत्सवानिमित्त सार्वजनिक मंडळणात सशर्त परवानग्या देण्यात आल्या असून प्रत्येक मंडळासह देवी मंदिर परिसरात सीसीटीव्ही अनिवार्य आहे. यात्रोत्सवासह गरबा व दांडिया कार्यक्रमांवर ही सिसीटिव्ही सिस्टीमचा पहारा राहणार असून प्रत्येक मंडळांजवळ पोलीस अंमलदार आणि होमगार्ड नेमण्यात आले आहेत. तसेच डीजे आणि लेझरचा वापर करणाऱ्यांना कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. पोलीस आयुक्तालय सह स्थानिक पोलीस ठाण्याची पदके मंडळासह यात्रोत्सवात पाहणी करणार आहेत. कालिकादेवी मंदिर व भगूर येथील रेणुकादेवी मंदिर यात्रा उत्सवासाठी सशस्त्र पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला असून दामिनी मार्शल, निर्भया पथकेही बंदोबस्तात सहभागी करण्यात आली आहेत.

Nashik News | ओझर परिसरात बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह विहिरीत आढळला

ग्रामीण भागात एकूण 30 ठिकाणी यात्रा उत्सव

नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये सप्तशृंगी गड, चांदवडची रेणुका देवी, येवल्यातली जगदंबा देवी, कसारा घाटातली घाटणदेवी या ठिकाणी मोठ्या स्वरूपातील यात्रा भरणार आहेत. तर 21 पोलीस ठाणे हद्दीत 30 महत्त्वाच्या ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा होणार असून ओझर, पिंपळगाव, बसवंत, निफाड, वावी, सिन्नर, कळवण, देवळा, अभोळणा, मनमाड, येवला शहर, सटाणा, मालेगाव छावणी या पोलिस ठाणे हद्दीमध्ये रावण दहनाचा कार्यक्रम होणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here