Nashik News | आदिवासी विकास विभाग आश्रमशाळांमध्ये भौतिक सुविधा तपासणी मोहीम राबवणार

0
25
#image_title

Nashik News | राज्यामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण तसेच भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागाने आता कंबर कसली असून शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधांवर “महानिरीक्षक ॲप”चे लक्ष असणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना उत्तम वातावरणात शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

Nashik News | ओझर परिसरात बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह विहिरीत आढळला

निवासी विद्यार्थ्यांसाठी सोयी सुविधा या मोहिमेतून तपासणार

राज्यामध्ये एकूण 497 आदिवासी विभागाच्या शासकीय आश्रम शाळा असून त्यामध्ये सुमारे दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या 527 अनुदान आश्रम शाळांमधून अडीच लाख विद्यार्थ्यांना विविध शिक्षण घेत आहेत. तसेच 37 एकलव्य निवासी शाळेत सुमारे दहा हजार विद्यार्थी शिकत आहेत. हे सर्व विद्यार्थी निवासी असल्याने आश्रम शाळांमध्ये भौतिक सुविधा तपासणी मोहीम राबविण्याचे काम आदिवासी विकास विभागाने हाती घेतले आहे.

Nashik News | बोरगावात प्राथमिक रुग्णालयात रुग्णवाहिके अभावी रुग्णांची गैरसोय; नागरिकांकडून गांधी स्टाईलमध्ये आंदोलन

आश्रम शाळेतील भौतिक सुविधा तपासण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक

या मोहिमेंतर्गत आश्रम शाळेतील पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, स्वयंपाक गृह, भोजन कक्ष व कोठीगृहे, विद्युत पुरवठा, शाळा तसेच वसतीगृह इमारत फर्निचर आदींची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून हे अधिकारी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन जिओ टॅगिंगद्वारे छायाचित्र व इतर माहिती महानिरीक्षकवर नोंदविणार आहेत. त्यामुळे प्रकल्प अपर आयुक्त स्तरावर मॉनिटरिंग करणे सोपे झाले आहे.

“शासकीय व अनुदानित आश्रम शाळांच्या सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी तसेच आवश्यकतेनुसार नवीन सुविधा निर्माण करण्यासाठी ‘महानिरीक्षक ॲप’ द्वारे तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच दर्जेदार शिक्षणासोबत अद्ययावत भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. भौतिक सुविधा चांगली मिळाल्यास विद्यार्थ्यांनाही आनंददायी वातावरणात शिक्षण घेता येईल.”

– संतोष ठुबे, सहआयुक्त (शिक्षण), आदिवासी विकास विभाग, नाशिक.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here