Nashik News | ओझर परिसरात बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह विहिरीत आढळला

0
31
#image_title

Nashik News | नाशिकच्या ओझर येथे गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विवाहित महिलेचा मृतदेह शुक्रवारी दिनांक 27 सप्टेंबर रोजी सायखेडा रोडवरील शिव रस्त्यावरील एका विहिरीत आढळला असून ही घटना आत्महत्येची आहे की घातपात आहे हे अंतर स्पष्ट होऊ शकले नाही.

Nashik News | बोरगावात प्राथमिक रुग्णालयात रुग्णवाहिके अभावी रुग्णांची गैरसोय; नागरिकांकडून गांधी स्टाईलमध्ये आंदोलन

19 सप्टेंबरला झाल्या होत्या बेपत्ता

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओझर येथील तानाजी चौकात वास्तव्यास असलेल्या शोभा विलास जाधव या विवाहित महिला 19 सप्टेंबर रोजी घरातून काही न सांगता निघून गेल्या होत्या त्यानंतर शोध घेऊन देखील त्या सापडल्या नाहीत. यामुळे त्यांचे पती विलास महादू जाधव यांनी पोलिसांमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

Nashik News | नाशकात लाच घेणारा विभागीय तांत्रिक अधिकारी ताब्यात

विहिरीत आढळला मृतदेह

यादरम्यान, शुक्रवारी दिनांक 27 सप्टेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास भडके वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर विहिरीची मोटर चालू करण्यासाठी केलेल्या शेतमजुराला विहिरीमध्ये महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. त्यानंतर, त्या व्यक्तिने पोलिसांना माहिती दिली असता, विहिरीत आढळलेली व्यक्ती शोभा जाधव असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पंचनामा करत मृतदेह पोस्टमार्टमसाठी पिंपळगाव येथे पाठविला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here