Nashik News | नाशकात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी 1950 टोल फ्री क्रमांक जारी करण्यात आला आहे. त्यावरील तक्रारींची दखल घेत पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. विधानसभा मतदारसंघाचे आचारसंहिता कक्ष प्रमुख व सहाय्यक नोडल अधिकारी यांची गुरुवार दि. 17 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा नोडल अधिकारी राजेंद्र वाघ, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा पडोळ, महापालिका उपायुक्त अजित निकत, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क शशिकांत गरजे, नायब तहसीलदार नरेंद्र जगताप व जिल्ह्यातील सर्व आचारसंहिता कक्ष प्रमुख उपस्थित होते. ज्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग झाला असेल तिथे, आयोगाच्या निर्देशानुसार आणि योग्य ती कार्यवाही करावी. अशा सूचना यावेळी निवास उपजिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्षाचे जिल्हा नोडल अधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिल्या.
आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी
तसेच, गंभीर गोष्ट असल्यास कायदेशीर गुन्हा दाखल केला जातो आणि कारावासाच्या शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे. सत्ताधारी पक्षाला निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे सरकारी घोषणा, नवीन योजना सुरू करता येत नाही, लोकार्पण, शीलान्यास, उद्घाटन, भूमिपूजन असे कोणतेही कार्यक्रम घेता येत नाहीत. सरकारी गाडी, सरकारी बंगला किंवा सरकारी विमानाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करण्यास या काळात सक्त मनाई असते. त्यामुळे आचारसंहिता कक्ष प्रमुख व सहाय्यक नोडल अधिकारी राजेंद्र वाघ यांनी आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी. असे आवाहन यावेळी केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम