Nashik News | मालेगावकरांसाठी डोळ्यांचे पारणे फेडणारा क्षण; कृषी विज्ञान संकुलाच्या पहिल्या टप्प्याचे आज लोकार्पण

0
30
#image_title

Nashik News | राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाच्या पहिला टप्प्याचा लोकार्पण सोहळा आज रोजी दुपारी 2.00 वा. काष्टी फाटा, नामपूर रोड, मालेगाव येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.

Nashik | ‘नाशकात मोठी गुंतवणूक आणणार, 80 टक्के चर्चा पूर्ण’; उद्योग मंत्री उदय सामंतांची घोषणा

भारतातील एकमेव भव्य कृषी विज्ञान संकुल

पालकमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शेतकऱ्यांसाठी विकास पर्व ठरणार आहे. हे कृषी विज्ञान संकुल 650 एकर क्षेत्रावर, काष्टी या ठिकाणी उभारले जाणार असून पाच पदवी व एक पदविका असलेले हे भारतातील एकमेव कृषी विज्ञान संकुल आहे.

Nashik News | इगतपुरी तालुक्यातील भावली धरणात बुडून युवकाचा मृत्यू

विद्यार्थी व शेतकऱ्यांना होणार फायदा

कृषी, उद्यान विज्ञा, अन्न तंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या शाखांतून पदवी असणारी महाविद्यालयात व कृषी तंत्रनिकेतन पदविकेसाठी वर्षभरात साधारणतः ३०० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकणार आहे. या कृषी संकुलात विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृह इमारत शेतकऱ्यांसाठी शेतकरी निवासाची व्यवस्था असणार असून शेतकरी बांधवांना शेतीपूरक व्यवसाय मार्गदर्शनासाठी प्रबोधन केंद्र असणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here