Nashik News | नाशिककरांवर ओढावणार पाणीकपातीचं संकट…

0
20
gangapur

Nashik News | नगर आणि नाशिकमधील धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय सोमवारी (ता. ६) घेतला जाणार आहे. दरम्यान गंगापूर धरणातून पाणी सोडण्याची मागणी लक्षात घेता नाशिकमध्ये पाणी कपातीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नगरसाठी उपयुक्त ठरणाऱ्या दारणा धरण समूहातून 2.64, तर गंगापुर धरण समूहातून 0.5 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र नगर आणि नाशिकमधून पाणी सोडण्याला विरोध करण्यात आलेला आहे. तर गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने पाणी सोडण्याचा निर्णय दिल्याने वाद निर्माण झाला आहे.

Nashik News | नांदगाव, चांदवड-देवळा तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यासाठी आमदार मैदानात…

यंदा कमी झालेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणे पूर्ण क्षमेतेने भरलेली नाहीत. मराठवाड्याला पाणीपुरवठा करणारे जायकवाडी धरण पूर्ण क्षमेतेने भरलेले नाही. त्यामुळे मेंढीगिरी समितीने समन्यायी पाणी वाटपाचा निर्णय दिलेला आहे. त्यानुसार जायकवाडी धरणामध्ये 37 टक्के पाणीसाठा असल्यास मुळा धरण समूहात 49 टक्के, प्रवरा 55 टक्के, दारणा धरण समूहात 54 टक्के, पालखेड धरणात 73 टक्के तर गंगापूर धरणात 61 टक्के पाणीसाठा ठेवावा असं धोरण निश्चित करण्यात आलेलं आहे.

त्यानुसार नाशिक आणि नगरमधील धरणांतून जायकवाडीसाठी 8.60 टीएमसी पाणी सोडण्याच्या सूचना गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिले आहे. दारणा धरण समूहातून 2064 टीएमसी, तर गंगापूर धरण समूहातून 0.50 टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडण्याच्या निर्णयामुळे महापालिकेच्या पाणी आरक्षणात घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोमवारी (दि. ६) पाणी सोडण्यासंदर्भात निर्णय होणार आहे.

Nashik News | आरक्षण नाही, तर दिवाळी नाही! सकल मराठा समाजाने घेतला मोठा निर्णय

शहरासाठी महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 6100 दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी नोंदविलेली आहे. त्यात गंगापूर धरण समूहातून 4400, मुकणे 1600 तर दारणा धरणातून 100 दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी आहे. गंगापूर धरण समूहातून 4400 दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी करण्यात आलेली आहे. त्यात 0.5 टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडले जाणार असल्याने नाशिक शहरात पाणीकपातीची शक्यता व्यक्त केली जाते आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here