Nashik News | आज नाशिक लोकसभा मंतदार संघात प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बादगुजर यांच्यावर ताडीपारीची कारवाई करण्यात आली होती. यानंतर आता पुन्हा पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली आहे. नाशिक लोकसभा मतदार संघात २० मे रोजी मतदान होणार असून, याआधीच शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. (Nashik News)
नाशिकमधील ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांना २० मे पर्यंत हद्दपार करण्याबाबतची नोटीस नाशिक पोलिसांकडून बजावण्यात आली आहे. अचानक पदाधिकाऱ्यांना अशा प्रकारची नोटीस बजावल्याने ठाकरे गट आक्रमक झाला आहे. तर, पोलिसांना हाताशी धरून आपल्यावर दबाव टाकला जात असल्याचे आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. तर, या पदाधिकाऱ्यांवर यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर या नोटिस नोटीस बजाल्याचा उल्लेख संबंधित नोटीसीत करण्यात आला आहे.(Nashik News)
Shantigiri Maharaj | भाजपचा शांतीगिरी महाराजांना पाठिंबा..?; महाराजांचा मोठा गौप्यस्फोट
Nashik News | समोरच्यांच्या पायाखालची वाळू सरकली
आज १८ मे पासून ते मतदानाच्या दिवसापर्यंत म्हणजेच २० मे पर्यंत नाशिकमध्ये थांबायचे नाही, अशी नोटीस आम्हाला पोलिसांकडून देण्यात आली असून, हे हेतूपुरस्कररित्या करण्यात येत आहे. समोरच्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून, त्यांचा पराभव होणार आहे हे त्यांना लक्षात आले आहे. त्यामुळेच पक्षाच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेपासून दूर ठेवण्यासाठी ही हद्दपारीची नोटीस बजावलेली असल्याचे असा आरोप युवा सेनेचे नाशिक जिल्हाप्रमुख राहुल ताजनपुरे यांच्याकडून करण्यात आले आहे. (Nashik News)
North Maharashtra | नाशकात आज तोफा थंडावणार; कोणाच्या आणि कुठे सभा होणार..?
पुन्हा ठाकरे शिंदे गट आमनेसामने
तिकीट न दिल्याने नाराज असलेले आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून शिंदे गटात प्रवेश केलेले विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांच्या भगूरमध्येच महाविकास आघाडीकडून भव्य रॅली आयोजित करण्यात आली होती. ही रॅली सुरु असताना शिंदेंच्या गटाचे पदाधिकारी व ठाकरे गटाचे पदाधिकारी (Shivsena UBT) पुन्हा एकदा समोरासमोर आले. आणि दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा बाजी केली. दरम्यान, यावेळी पोलिसांची मात्र चांगलीच धावपळ उडाली होती. पोलिसांनी मध्यस्थीमुळे कुठलाही वाद झाला नाही. (Nashik News)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम