नाशिक : नाशिकमध्ये नुकतीच पावसाने हजेरी लावली असून, अद्याप पावसाने जोरही धरला नाही की त्यापूर्वीच नाशिक शहरात डेंग्यू आणि स्वाईन फ्लूने बाधित रुग्णांची संख्या वाढ होत आहे. तर, यामुळे अनेकांचा मृत्यूही झाला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये डेंग्यूचा प्रसार होत असून, डेंग्यूने बाधित रुग्णांच्या संखेत वाढ होत असतानाच आता स्वाईन फ्लूनेही डोके वर काढले आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.(Nashik News)
नाशिकमध्ये स्वाईन फ्लूने बाधित असलेल्या दोघांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत तब्बल ३१ जणांना त्याची लागण झाली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांतच नाशिकमध्ये डेंग्यूनंतर आता स्वाईन फ्लूचाही धोका वाढत आल्याचे दिसत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांतच डेंग्यू आणि स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच एका डेंग्यूच्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. तर काही दिवसांपूर्वी स्वाईन फ्लूच्याही रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे आता आरोग्य विभाग खडबडून जागे झाले असून, उपाययोजना राबवल्या जात आहे.(Nashik News)
जानेवारीपासून ते मेपर्यंत या मागील चार महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ही १०४ वर पोहोचली आहे. मे महिन्यातच जवळपास ३३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मात्र, पावसाळ्यापूर्वीच डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ही शंभरी पार गेल्याने ऐन पावसाळ्यात नाशिकमधील परिस्थिती आणखी बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.(Nashik News)
Swine Flu | स्वाईन फ्लूमुळे नाशिककरांची चिंता वाढली; आतापर्यंत इतक्या रुग्णांना मृत्यु..?
Nashik News | धूर फवारणी केवळ नावालाच
तर, यया पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांनी धूर फवारणी ही केवळ नावालाच असून प्रत्यक्षात ती होत नाही. तर, याठिकाणी फवारणी तेथे केवळ धूराचीच फवारणी केली जाते. औषधी धूर फवारणीमध्ये नसल्याचा आरोप काही स्थानिक नागरिकांनी केला आहे. तर, काहीही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित रुग्णालयात जाऊन तपासणी करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. (Nashik News)
Nashik Rain Update | नाशिकमध्ये एक तासाच्या पावसातच उड्डाण पुलावरून कोसळले धबधबे
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम