Nashik News | नाशिकमध्ये नदीपात्रात लाखो मृत माशांचा खच; महानगरपालिकेच्या कारभारावर नागरिकांचा संताप

0
22
Nashik News
Nashik News

नाशिक :  काल मध्यरात्रीपासून नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. तर, नांदगाव, मनमाड, मालेगाव, देवळा तालुक्यांत मुसळधार पाऊस झाल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे समोर आलेल्या माहितीनुसार नाशिकच्या वालदेवी नदी पात्रात (Waldevi River) लाखो मासे मृत्युमुखी पडले आहेत.

नाशिकच्या वालदेवी नदीत लाखो मृत माशांचा खच पडला असून, तब्बल नदीच्या दोन किलोमीटरच्या परिसरात हे मासे मृतावस्थेत आढळले आहेत. नाशिक महानगरपालिकेची (Nashik NMC) ड्रेनेज लाईन या भागात फुटल्याने दूषित पाण्यामुळे हे मासे मृत्यूमुखी पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हे मृत मासे पाण्यावर तरंगत आहेत. तर, नदीच्या पाण्यात अनेक प्रकारचे जिवाणूही आढळले  आहेत. दरम्यान, या घटनेमुळे स्थानिक नागरिकांकडून महानगरपालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.

Nashik News | आत आजी माजी खासदारांची ‘गळाभेट’; बाहेर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

Nashik News | यापूर्वीही हजारो माशांचा मृत्यू

यापूर्वीही नांदूरमध्यमेश्वर येथे वालदेवी (waldevi river) नदीपात्रात हजारो मासे मुरत्यूमुखी पडले होते. तर, त्यावेळी गटारींच्या आणि कारखान्यांच्या रसायनयुक्त प्रदूषित पाण्यामुळे या माशांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात होते. दरम्यान, आता पुन्हा याच वालदेवी नदीत लाखों माशांचा मृत्यू झाला आहे. नद्यांचे पाणी हे मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याने माशांच्या आणि अन्य जलचरांच्या ते जीवावर उठले आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींकडून (Environmentalist) संताप व्यक्त केला जात आहे.  (Nashik News)

Nashik News | नाशिकमध्ये मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात मोठे बदल

नद्यांची झाली गटारगंगा

दरम्यान, नाशिकमधील गोदावरी नदी आणि अन्य नद्यांचे पाणी हे दिवसेंदिवस प्रदूषित झाल्याने हा मुद्दा गंभीर बनला आहे. थेट गटारींचे गोदापात्रात मिसळवले जाणारे पाणी, कारखाने आणि महापालिकेच्या एसटीपी प्लँटमधून प्रक्रिया न करता सोडले जाणारे दूषित सांडपाणी यामुळे गोदावरी आणि अन्य नद्यांचीही गटारगंगा झाली आहे. त्यातच या नद्यांच्या प्रदूषित पाणी हे नदीतील जलचर प्राण्यांच्या जीवावर बेतत असल्यामुळे ही चिंतेची बाब असून, त्यामुळे आता नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी गांभीर्याने पावले उचलण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे. (Nashik News)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here