Nashik News | आत आजी माजी खासदारांची ‘गळाभेट’; बाहेर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

0
46
Nashik News
Nashik News

Nashik News : नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना या लढतीत ठाकरे गटाच्या राजभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांनी बाजी मारली आणि हेमंत गोडसे (Hemant Godse) यांची हॅटट्रिक हुकली. गोडसेंचा दारुण पराभव झाल्याने बालेकिल्ला शिवसेनेच्या हातून निसटला. दरम्यान, निवडणूक संपताच या दोन्ही शिवसैनिकांनी वीर विसरून एकमेकांची गळाभेट घेतल्याचे अनपेक्षित चित्र आज नाशिकमध्ये पहायला मिळाले. तर, ठाकरे गटाचे नाशिकचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे आणि शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत गोडसे हे समोरासमोर आले. यावेळी मंत्री दादा भूसेदेखील उपस्थित होते आणि त्यांच्यासमोरच या दोघांनी एकमेकांना ‘जादू की झप्पी’ दिली.

मात्र, दुसरीकडे ठाकरे विरुद्ध शिंदे गट (Shiv Sena)  गट आमनेसामने आल्याने पुन्हा एकदा जोरदार घोषणाबाजी रंगली. बघा यावेळी नेमकं काय घडलं… नुकताच लोकसभा निवडणूकीचा(Lok Sabha Election 2024) गुलाल उधळला असून, आता नाशिक, मुंबई आणि कोकण पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांमध्ये विधान परिषद निवडणुकीची लढत रंगली आहे. तर, नाशिकमध्ये आता या निवडणुकीतही चांगलेचे घमासान पहायला मिळत आहे.  महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) संदीप गुळवे यांना उमेदवारी देण्यात आली असून, महायुतीत (Mahayuti) लोकसभेप्रमाणे इथेही रस्सीखेच पहायला मिळाले.

Nashik Lok Sabha Result | नाशिकमध्ये परिवर्तनाचे वारे फिरले; गुलाल राजाभाऊ वाजेंचाच

Nashik News |  आजी माजी खासदारांची ‘गळाभेट’

आज नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी दोन्ही शिवसेना आणि त्यांचे कार्यकर्ते, हे आज नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात समोरासमोर आले. यावेळी ठाकरे गटाचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे आणि शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत गोडसे हे समोरासमोर आले. याठिकाणी पालकमंत्री दादा भुसे हेदेखील उपस्थित होते. मंत्री भूसेंसमोरच आजी माजी खासदारांची गळाभेट झाली. यावेळी दोघांनी गळाभेट घेत एकमेकांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. (Nashik News)

बाहेर मात्र जोरदार घोषणाबाजी 

एकीकडे कार्यालयात आजी माजी खासदार राजाभाऊ वाजे आणि हेमंत गोडसे यांची गळाभेट झाली असताना दुसरीकडे दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने दोन्ही गटाच्या कार्यकरतींनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबेजी केली. ठाकरे गटाचे संदीप गुळवे उमेदवारी अर्ज दाखल करून कार्यालयातून बाहेर येत होते आणि किशोर दराडे हे अर्ज दाखल करण्यासाठी जात असताना या दोन्ही गटांचे कार्यकर्ते समोरासमोर आले.

Nashik Lok Sabha Result | राजाभाऊ वाजेंची विक्रमी आघाडी; गोडसेंची हॅट्रिक धोक्यात


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here