Nashik News | मालेगावात ८ वर्षीय मुलीचा मृतदेह विहिरीत; ग्रामस्थांकडून रास्ता रोको

0
14
Nashik News
Nashik News

Nashik News |  काही दिवसांपूर्वी वणी येथे सप्तश्रृंगी गडाचा शीतकडा येथून उडी मारून प्रेमी युगुलांनी आयुष्य संपवल्याची घटना ताजी असतानाच आता या भागातून आणखी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालेगाव तालुक्यातील (Malegaon) अजंग येथे एका ८ वर्षीय बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपासून ही मुलगी बेपत्ता होती आणि यानंतर तिचा मृतदेह विहरीत आढळून आला आहे. दरम्यान, ही घटना उघडकिस आल्यानंतर येथील संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले.

Nashik News | नेमकं प्रकरण काय..?

मालेगाव तालुक्यातील अजंग या गावातून गेल्या दोन दिवसांपूर्वी स्वतःच्या राहत्या घरातून एक आठ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती. यानंतर बेपत्ता या मुलीचा मृतदेह मोसम नदीकाठी (Mosam River) असलेले विनोद शिरोळे यांच्या विहिरीत आढळून आला. त्यामुळे या परीसरात एकच खळबळ उडाली आहे.

या संतप्त घटना उघडकीस येताच येथील संतप्त ग्रामस्थ्यांनी नामपूर-मालेगाव रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. तसेच या गुन्ह्याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि संबंधित आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी ग्रामस्थांनी केली. यानंतर तातडीने पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Nashik News | व्हाट्सअ‍ॅप ग्रुपच्या ॲडमिन्सलाही नोटिस; १५ शेतकरी आंदोलक ताब्यात

सप्तशृंगी गडावर प्रेमी युगुलांनी संपवलं जीवन

गेल्या काही दिवसांपूर्वी सप्तश्रृंगी गड येथील शीतकड्यावरून उडी मारत तरुण तरुणीने आयुष्य संपवलयाची घटना घडली होती. या दोघांनी येथील शीतकड्यावरून ४०० फूट खोल दरीत उडी घेत आत्महत्या केली. प्रियंका संतोष तिडके, मंगेश राजाराम शिंदे असे मृत तरुण-तरुणीचे नावं आहेत.

यानंतर तब्बल आठवड्याभरानंतर या दोघांचे मृतदेह येथे कुजलेल्या अवस्थेत आढळले. सप्तश्रृंगी गडाच्या पायथ्याला असणाऱ्या भातोडे गावातील गुराख्यांनी याबाबतची माहिती पोलीस पाटील विजय चव्हाण यांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांचे मृतदेह दरीतून बाहेर काढले.

Nashik News | उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here