Nashik News | दि. ३१ जानेवारी बुधवार रोजी नाशिकच्या काही बड्या बांधकाम व्यवसायिकांच्या घरी सकाळी ७ वाजता ईडीची धाड पडली होती. ईडीचे पथक हे मोठ्या फौजफाट्यासह नशिक शहरात दाखल झाले होते. शहरात एकाचवेळी तब्बल १४ ठिकाणी हे सर्च ऑपरेशन राबवले गेले असून, या ईडी धाड सत्रात नाशिकमधील बी. टी. कडलग, हर्ष कन्स्ट्रक्शन, पवार-पाटकर बिल्डर्स, सांगळे कन्स्ट्रक्शन, सोनवणे बिल्डर्स या काही बड्या बांधकाम व्यावसायिकांचा समावेश होता.
दरम्यान, यामुळे शहरातील राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील लहान मोठे सर्वच नेतेमंडळींचे धाबे दणाणले होते. कारण या व्यावसायिकांचे काही राजकीय व्यक्तींसोबत सलोख्याचे संबंध असून, यातील काही सरकारी ठेकेदारही असल्याचे समोर आले आहे. या बांधकाम व्यवसायिकांच्या घरी व कार्यालयांवर आयकर विभागाने छापेमारी केली होती. गेल्या ५ दिवसांपासून ही छापेमारी सुरू आहे. या चौकशीतून काय काय समोर येते याची सर्वांनाच उत्सुकता होती. यातच आता या छापेमारीबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली असून, एका कंत्राटदाराच्या कार्यालयावर छापा टाकला असता, त्याच्या कर्मचाऱ्यांच्या घरातून आणि कारमधून कोट्यवधी रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.(Nashik News)
Nashik | नाशिकमध्ये ‘ईडीअस्त्र’ बरसले; मोठे व्यावसायिक रडारवर
Nashik News | ‘इतकी’ रोकड हस्तगत
यातच आता या छापेमारीबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यात एका बांधकाम व्यावसायिक तथा सरकारी कंत्राटदाराच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला असता, या छाप्यात कोट्यवधी रुपयांची रोकड ताब्यात घेण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात ही छापामारी करण्यात आली असून, गेल्या चार ते पाच दिवसांपासून ८ पेक्षा जास्त ठिकाणी ही छापेमारी झाल्याची माहिती समोर आली आहे. ८५० कोटीपेक्षा जास्त रुपयांचे व्यवहार हे बेहिशेबी असल्याचा आयकर विभागाला संशय असून, त्यांनी या छाप्यात तब्बल ८ कोटी रुपयांची रोकड, ३ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने व सोन्याचे बिस्किट जप्त केल्याची माहिती ‘एबीपी माझा‘ने प्रसिद्ध केली आहे.(Nashik News)
Eknath Shinde | ‘पीएमएलए’ कायद्याअंतर्गत मुख्यमंत्र्यांना अटक करा..?
कर्मचाऱ्यांच्या गाडीत आणि घरी…
दरम्यान, आयकर विभागाच्या या छापेमारीत या व्यावसायिकांच्या कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची कागदपत्रे, काही पेन ड्राइव्ह हे चौकशीसाठी जप्त करण्यात आलेले आहेत. काही रक्कम ही या व्यवसायिकांच्या कर्मचाऱ्यांच्या घरी तर काही कर्मचाऱ्यांच्या कारमधून ही रोकड ताब्यात घेण्यात आली आहे. आता पुढे या आयकर विभागाच्या चौकशीतून आणखी काय काय उलगडते? आणि यातून काही राजकीय धागेदोरेही बाहेर येता का? हे पाहणे आता मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे.(Nashik News)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम