नाशिक : नाशिकच्या (Nashik) दिंडोरी तालुक्यातील एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेला एक आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला.पिडीत मुलीचा मृतदेह आढळून आलेला असून त्या मुलीने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे.यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील ही संपुर्ण घटना आहे. (Nashik News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडोरी पोलिस ठाण्यात 27 सप्टेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपळनारे गावातील ग्रामपंचायत सदस्य उमेश खांदवे या विवाहित इसमाने अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. एका वीस वर्षीय युवतीवर त्याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला. या तपासातून ती मुलगी काही महिन्यांची गर्भवती असल्याची माहीती समोर आली आहे. दरम्यान आरोपीला न्यायालयाने 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. 28 सप्टेंबरला दिंडोरी पोलीस आरोपी उमेशला तपासासाठी त्र्यंबकेश्वरला घेऊन गेले असता तिथून परत येत असतांना नाशिक शहरातील गंगापूर रोडवर लघुशंकेच्या बहाण्याने आरोपी पोलीस वाहनातून खाली उतरला आणि पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला झटका देऊन त्याने पळ काढला.
Tamilnadu Bus Accident :तामिळनाडूमध्ये प्रवासी बस 100 फूट दरी कोसळून 9 जणांचा मृत्यू
विशेष म्हणजे फरार आरोपीचा शोध सुरु असतांनाच रविवारी (01 ऑक्टोबर 2023) सकाळी पिडीत मुलीच्या कुटुंबीयांनी आमची मुलगी बेपत्ता झाल्याची दिंडोरी पोलीसांकडे तक्रार देताच पोलिसांनी तिचा शोध सुरु केला आणि धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या घराजवळील एका विहीरीत तिचा मृतदेह आढळून आला. मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. फरार आरोपी उमेश खांदवेचा शोध सुरु असतांना आरोपीच्या घराजवळ मी आत्महत्या करत आहे, अशा आशयाचा मजकूर लिहिलेला एक कपडाही पोलिसांना आढळून आल्याची दिंडोरी गावात चर्चा आहे. दिंडोरी पोलीस आणि सरकारवाडा पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून, या संपूर्ण प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
Shirdi Temple: साईभक्तांना देणगीच्या बनावट पावत्या देऊन पैशांचा गैरव्यवहार
दिंडोरी तालुक्यामध्ये उडाली खळबळ..
दिंडोरी तालुक्यात या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. दिंडोरी तालुक्यातील पिंपळणारे येथील उमेश खांदवे याने संबंधित मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याच्यावर दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिंडोरी पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर त्र्यंबकेश्वरला देखील संशयित खांदवे यास घेऊन तपास करण्यात आला आहे. याचवेळी संशयितास घेऊन जात असताना संशयिताने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला. अशातच संबंधित प्रकरणातील मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार मुलीच्या आईवडिलांनी केल्याने आता पोलिसांसमोर प्रकरणाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान उभे राहणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम