Nashik | वायू प्रदूषणाबाबत राष्ट्रवादी युवा काँग्रेसची शहरात जनजागृती

0
39

Nashik | नाशिक शहर वायू प्रदूषणाच्या उंबरठ्यावर असून मुंबई-पुणे शहरापेक्षा नाशिकचे वायू प्रदूषण कमी असल्याने हव्याची गुणवत्ता शुद्ध ठेवण्याकरिता जनजागृती करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी नाशिक शहरात विविध ठिकाणी होल्डिंग लावून जनजागृती केलेली आहे. नाशिकचे वातावरण सद्यस्थितीत सुदृढ वाटत असले तरी प्रत्यक्षात नाशिकच्या हवेमध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढू लागलेले आहे. नाशिक प्रदूषणातील धोकादायक शहरांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.

Nashik news | नाशिकमधील ८ तालुके, दुष्काळसदृश्य जाहीर अशा आहेत सवलती

अलीकडच्या वर्षांत हवेची गुणवत्ता खालावली असून एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) च्या माध्यमातून हि बाब समोर येते आहे. वाढती लोकसंख्या, बांधकाम क्षेत्रामध्ये वाढ, वाहनांची संख्या, औद्योगिक क्षेत्र यासोबत अनेक घटकांत वाढ झाल्याने परिणामी हवेत प्रदूषणाचे प्रमाण वाढते आहे. दिवाळीपूर्वी नाशिक शहरातील हवेची गुणवत्ता चांगली असून दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे वातावरण प्रदूषित होते.

अजित पवार-फडणवीसांच्या जागी कार्तिकी पूजेची मागणी झाल्यावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया

बाजारपेठेत इको-फ्रेंडली फटाके आले असून याची जनजागृती होणे गरजेचे आहे. यावर वेळीच लक्ष दिलं नाही तर नाशिकची हवा प्रदूषित होण्यास वेळ लागणार नाही. नाशिक शहर चांगल्या दर्जाच्या हवेसाठी ओळखले जात असून शहरात धूळ निर्माण होण्याचे प्रमाण वाढल्याने परिस्थिती बदलते आहे. शहरातील हवेची गुणवत्ता चांगली ठेवण्यासाठी नाशिककरांना जनजागृती होणे गरजेचे असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी नाशिक शहरातील विविध ठिकाणी होल्डिंग लावून जनजागृती केलेली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here