बापरे ! आता नाशिक महानगरपालिकेतही लाचखोरीचे जाळे…

0
37
नाशिक महापालिका

नाशिक : सध्या जिल्ह्यात लाचखोरीचे अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. नुकतेच जिल्हा रुग्णालयात या लाचखोरीचा मोठा घबाड उघडकीस आल्यानंतर आता या लाचखोरीचे वारे थेट नाशिक महानगरपालिकेपर्यंत पसरले आहे.

नाशिकरोड मनपा विभागीय कार्यालयात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यावेळी महापालिकेतील दोन कर्मचाऱ्यांनी एका सफाई कर्मचाऱ्यांकडे पाच हजार रुपयांची मागणी केली होती. यासंदर्भात त्या सफाई कर्मचाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ही तक्रार केली. त्यांनी ह्या तक्रारीची त्वरित दखल घेत सदर विभागाच्या पथकाने सापळा रचला होता. त्या दोघा कर्मचाऱ्यांनी लाच स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले असून त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वच्छता निरीक्षक राजू निरभवणे आणि सफाई कर्मचारी बाळू जाधव असे या लाचखोर संशयितांची नावे आहेत.

दरम्यान, चौकशीदरम्यान या दोघा कर्मचाऱ्यांनी लाच घेल्याची कबुली दिली होती. तसेच या दोघांनी सफाई कर्मचाऱ्यांकडून महिन्याला ठराविक रक्कम देऊन संपूर्ण पगार घेण्याची योजना आखल्याची कबुली दिली आहे.

काय आहे त्यांनी आखलेली ही स्कीम

चौकशीमध्ये दिलेल्या काबुलीनुसार, ह्या दोघांनी एक नवी स्कीम महापालिकेत आखली होती, ज्यातून हे संशयित पैसे कमावणार होते. यात सफाई कर्मचाऱ्याने महिन्याला पाच हजार रुपये देऊन त्या बदल्यात कामावर न येता संपूर्ण पगार घेण्याची योजना या संशयितांनी आखली होती. मात्र, त्या तक्रारदाराच्या तक्रारीमुळे ह्या दोघांचे मोठे बिंग फुटले आहे.

दरम्यान, नाशिक महापालिकेचे हजारो सफाई कामगार शहर स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसरात्र मेहनत करतात. त्यात शहरातील बहुतांश सफाई कामगार सकाळी पाच वाजल्यापासून सात वाजेपर्यंत शहरातील सर्व सहा विभागात हे कर्मचारी स्वच्छतेत तत्पर असतात. मात्र याच विभागातील दोघा कर्मचाऱ्यांनी या सफाई कर्मचाऱ्याला लुबाडण्याचा गोरखधंदा उघडकीस आला आहे. तसेच, मनपात अधिकारीवर्ग आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्यांवर मेहरबानी करत असल्यची ओरड अनेकदा होत होती. मात्र, आता या कारवाईमुळे मनपातील अनेकांचे धाबे दणाणले आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here