नाशकात मनपाला म्हाडा प्रकरणातील खुलासे प्राप्त

0
32

द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : मनपाच्या नगररचना विभागाकडून वादग्रस्त म्हाडा प्रकरणांत कारणे दाखवा अशी नोटिस बजावण्यात आली होती. त्यापैकी ६५ बिल्डरांचे खुलासे महापालिकेला मिळाले असून महापालिका आयुक्त रमेश पवार यांच्या अंतिम तपासणी नंतर अहवाल थेट शासनाकडे पाठवला जाईल.

एकूण ६५ बिल्डरांना नगररचना विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र त्यापैकी केवळ ५३ जणांनी या नोटीसला उत्तर दिले होते. तर १२ जणांनी खुलासे केलेले नव्हते. अशा सर्वांना दुसरी व अंतिम नोटीस देण्यात आली होती.

यानंतर सर्व खुलासे महापालिकेला मिळाले आहेत. नियमाप्रमाणे एक एकरावरील प्रकल्पामध्ये आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न गटाकरिता २० टक्के सदनिका राखीव ठेवणे बंधनकारक आहे. मात्र नियमांचे पालन न झाल्याने नाशकात जवळपास सात हजार सदनिकांचा घोटाळा झाल्याचे बोलले जात आहे.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल अत्यंत बारकाईने संपूर्ण प्रकरणा हाताळत त्यावर ते लक्ष ठेवून आहेत. अग्रवाल यांच्या पुढाकाराने आतापर्यंत एकूण ६५ फायलींची तपासणी करण्यात आली आहे. तरी ज्या बिल्डरांनी खुलासा केला आहे, त्यांची देखील तपासणी करून प्रत्येक प्रकरणाकरिता एक स्वतंत्र फाईल तयार करण्यात आली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here