नाशिक : नविन नाशिक सकल मराठा समाज शिवजन्मोत्सव समिती ची बैठक पार पडली नविन नाशिक सकल मराठा समाजाच्या वतीने अध्यक्ष स्थानी अमित खांडे तर महिला अध्यक्षपदी साधना मटाले, महिला कार्य अध्यक्ष पदी कोमल महाले, कार्याध्यक्ष पदी पंकज पाटिल यांची नियुक्ती केली आहे.
श्रीमती सरस्वती गुलाबराव पाटील, पाटिल नगर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रा अमोल पाटिल यांनी प्रास्ताविक केले यावेळी बैठकीचे अध्यक्ष सन्मानिय प्रा.प्रशांत पाटिल यांना देण्यात आली. ज्येष्ठ नेते गोपाळ पाटील, जगन आण्णा पाटील, जिभाऊ बच्छाव, सुनिल पाटिल, देवराम पाटिल, सुनिल आहिरे, राकेश ढोमसे, यांनी आपले विचार मांडले.
यावेळी बाळासाहेब गीते, आशिष हिरे, संजय भामरे,विजय पाटिल, अमोल पाटिल, उमेश चव्हाण, अभय पवार, सागर पाटिल, प्रितम भामरे, डॉ वैभव महाले, यांनी सूचना मांडल्या. यावेळी नविन नाशिक सकल मराठा समाज च्या वतीने महिलांच्या हस्ते दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्प हार अर्पण करून नाशिक जिल्ह्यातील मृत्यू मुखी पडलेल्या शहीद जवान यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
समाजातील प्रतिनिधींकडून शिवजयंती निमित्त वर्षभर कोणते कोणते कार्यक्रम कराययचे या बाबत सूचना मांडण्यात आल्या. यावेळी नाशिक जिल्ह्यातील जे जवान शहीद झाले आहे त्यांच्या कुटुंबांचा सत्कार व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्याचे योजीले आहे. शिवजयंती दरवर्षी प्रमाणे त्रिमूर्ती चौक या ठिकाणी करण्यात येणार आहे.
यावेळी नविन नाशिक सकल मराठा समाजाच्या वार्षिक कार्यक्रमासाठी सर्वानुमते कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
नविन नाशिक सकल मराठा समाजाच्या वतीने अध्यक्ष स्थानी अमित खांडे तर महिला अध्यक्षपदी साधना मटाले, महिला कार्य अध्यक्ष पदी कोमल महाले, कार्याध्यक्ष पदी पंकज पाटिल, खजिनदार पदी योगेश गांगुर्डे, प्रवक्ता अमोल पाटील, प्रसिध्दी प्रमुख योगेश जाधव, सोशल मीडिया जय पवार, उपअध्यक्ष हर्षल चव्हाण, बंटी पवार, बबलू पगार, प्रितेश पाटिल, सरचिटणीस पदी शुभम महाले, करण आरोटे, दिनेश नरवडे, योगेश आहीरे, उमेश धामणे, संघटक पदी भुषण भामरे, अमोल खैरनार, नितीन पाटिल, चिटणीस पदी अमोल सूर्यवंशी, हर्षल पाटिल, आकाश कदम, हर्षल मराठे, अविनाश मालुंजकर, राहुल आहेर, सचिव पदी अक्षय पाटिल यांचे नाव सर्वानुमते घोषित करण्यात आले. यावेळी आलेल्या सर्व समाजाचे ज्येष्ठ नेते,युवा नेते, व पदधीकारी यांचे योगेश गांगुर्डे यांनी आभार मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम