Nashik | मांजरपाडा २ ही योजना कार्यान्वित करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी नागपूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत बोईसर येथे नगरपरिषद तसेच उत्तर महाराष्ट्रासाठी मांजरपाडा २ ही योजना कार्यान्वित करण्याबाबत निवेदन दिले.
Sudhakar Badgujar | …तर मी आधिक्षकांच्या दालनातच फाशी घेईल- सुधाकर बडगुजर
नाशिक जिल्हयातील सुरगाणा, कळवण, देवळा, सटाणा आणि मालेगाव ह्या तालुक्यांसोबतच धुळे आणि जळगाव ह्या जिल्ह्यांसाठीही वरदान ठरणाऱ्या ‘मांजरपाडा- २’ ह्या योजनेला तातडीने कार्यान्वित करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेण्यासोबतच नाशिकमधील सुरगाणा, कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव ह्या तालुक्यांसोबतच धुळे, जळगाव ह्या जिल्हयापर्यंतचा पिण्याच्या तसेच शेतीच्या पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मांजरपाडा-२ हा प्रकल्प राबविणे हे अत्यंत आवश्यक असून, तो तातडीने कार्यान्वित करण्यात यावा असे आवाहन यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केले.
CM Eknath Shinde | अपघातग्रस्तांसाठी मुख्यमंत्री बनले देवदूत; वाचवले तरुणाचे प्राण
मांजरपाडा-२ ह्या प्रकल्पा सोबतच सांगुळपाणी ही योजना देखील तातडीने कार्यान्वित होणे गरजेचे असून, सांगुळपाणी ह्या योजनेच्या सर्वे करण्याचे देखील आदेश द्यावे अशा आशयाचे निवेदन यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले असता, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही दोन्ही कामे त्वरित मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस श्री. संतोषराव मराठे, प्रदेश चिटणीस श्री. पंजाबराव देशमुख आदि उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम