Nashik Loksabha | लोकसभा निवडणुकांदरम्यान नाशिकचे राजकीय महत्त्व वाढले असून, सध्या नाशिकमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने नाराज असलेले ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी काही दिवसांपूर्वी आपला नाशिक लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर, यानंतर आता त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.(Nashik Loksabha)
रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विजय करंजकर यांचा पक्ष प्रवेश झाला. यावेळी मंत्री दादाजी भुसे, अजय बोरस्ते आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, शिंदे गटात दाखल झाल्यानंतर त्यांना जिल्हाप्रमुख देण्यात आले असून, अजय बोरस्ते यांना उपनेते पद देण्यात आले आहे. दरम्यान, विजय करंजकर यांनी निवडणुकीतून माघार घेतली असून, आज ते आपला अर्ज मागे घेऊ शकतात.
Nashik Loksabha | बाकीची नावं अजून गुलदस्त्यात
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर करंजकर यांनी सांगितले होते की आपल्यासोबत भगूर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, आणि नाशिक शहरामधील 27 ते 30 नगरसेवक आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यामुळे आता हे नगरसेवक आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्यही त्यांच्यासोबत शिंदे गटात प्रवेश करू शकतात. काल फक्त विजय करंजकर यांचाच पक्ष प्रवेश झाला असून, बाकीची नावं अजून गुलदस्त्यात आहे. (Nashik Loksabha)
Nashik Loksabha | दादा भुसेंच्या शिष्टाईला यश; करंजकर यांचा शिंदे गटात प्रवेश..?
दोन-तीन दिवसांत नाशिक लोकसभेचे चित्र बदलणार
दरम्यान, विजय करंजकर यांचा हा दावा खरा ठरल्यास नाशिक लोकसभेचे चित्र बदलू शकते. येणाऱ्या दोन ते तीन दिवसांत हे चित्र स्पष्ट होईलच. पण करंजकर यांच्या शिंदे गटात येण्याने ठाकरे गटाला मात्र नक्कीच मोठे खिंडार पडले आहे. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासमोरील करंजकर यांचे आव्हान संपुष्टात आणण्यात नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांना मोठे यश आले आहे. (Nashik Loksabha)
शांतिगिरी महाराजांचीही समजूत घालणार..?
केवळ करंजकरच नाहीतर, अपक्ष उमेदवारी लढवणारे स्वामी शांतिगिरी महाराज यांची देखील समजूत घालण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, गोडसेंसमोरील आव्हान कमी करत त्यांना पाठिंबा मिळवून देण्याचा शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांचा प्रयत्न असून, असे झाल्यास नाशिक लोकसभेच्या रिंगणात गोडसे यांचे बळ वाढणार आहे. त्यामुळे आगामी काळात आता कोण कोणते पत्ते उघडतील हे पहावे लागणार आहे. पण नाशिक लोकसभेची ही चुरस मात्र आणखी मनोरंजक आणि उत्सुकतेने भरलेली असणार यात शंकाच नाही. (Nashik Loksabha)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम