Nashik Loksabha | नाशिकमध्ये ठाकरे-शिंदे गट आमने सामने; तर, शिंदेंनी चालवला काल्पनिक बाण

0
74
Nashik Loksabha
Nashik Loksabha

Nashik Loksabha |  नाशिक लोकसभेची निवडणूक ही सुरुवातीपासूनच चर्चेत राहिली आहे. दरम्यान, नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी २० मे रोजी मतदान होणार असून, प्रचार संपण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहले आहे. यासाठी कालपासून राज्यातील सर्व पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी नाशिकमध्ये तळ ठोकला असून, दोन्ही गटांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात आहे.

काल महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. तर, दुसरीकडे राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची आणि भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. आजही दिग्गज नेत्यांच्या तोफा नाशिकमध्ये धडाडणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांची भारती पवारांच्या प्रचारार्थ नुकतीच मानमाड येथील सभा पार पडली तर, आज शरद पवारांची ही मानमाड बाजार समिती येथे भास्कर भागरेंच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती.

Nashik Loksabha | पन्नास खोके एकदम ओके

इकडे नाशिकमध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हेमंत गोडसेंच्या प्रचारार्थ भव्य रोड शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी पुन्हा एकदा ठाकरे-शिंदे गट आमने सामने आले. नाशिकच्या गंगापूर रोड येथील मॅरथॉन चौकात हा प्रकार पाहायला मिळाला. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राजाभाऊ वाजे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. तसेच मुख्यमंत्र्यांना बघून त्यांनी जोरजोरात “पन्नास खोके एकदम ओके” अशी जोरदार घोषणाबाजी केली. तर, यावेळी मशालीचे चिन्हही दाखवले.

Nashik Loksabha | दिग्गजांच्या तोफा नाशकात धडाडणार; याचा उमेदवारांना फायदा होणार..?

मुख्यमंत्र्यांनी सोडला काल्पनिक बाण  

दरम्यान, या ड्रामात मुख्यमंत्र्यांनीही सहभाग घेतला आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना इशारा देत त्यांच्यावर काल्पनिक बाण शिंदे यांनी सोडला. आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास हा हायव्हॉल्टेज ड्रामा नाशिकच्या मॅरथॉन चौकात पाहायला मिळाला.

याआधीही ठाकरे गटाकडून असा प्रकार 

हेमंत गोडसे आणि भारती पवार उमेदवारी अर्ज भरणार त्यादिवशीही नाशिकमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य रोड शो चे आयोजन करण्यात आले होते. यावेळीही शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयासमोरून ही रॅली जात असताना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी या रॅलीला मशाली दाखवल्या आणि घोषणाबाजीही केली.

Nashik Loksabha | नाशिक लोकसभेचे दृश्य स्पष्ट होणार; करंजकरांसोबत किती नगरसेवक शिंदे गटात येणार..?


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here