Nashik Loksabha | गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीत सुरू असलेल्या नाशिकच्या उमेदवारीबाबतच्या हाय्व्हॉल्टेज ड्रामाचा काल अखेर शेवट झाला आणि नाशिकची जागा शिंदे गटाला मिळाली असून, हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुरुवातीपासून या जागेसाठी हेमंत गोडसे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात रस्सीखेच सुरू होती. हे दोन्ही नेते उमेदवारीसाठी आग्रही होते. मात्र, दिल्लीतून नाव फायनल झाले असूनही, राज्यात आपली उमेदवारी जाहीर करण्यास उशीर होत असल्याने नाराज भुजबळांनी जाहीर माघार घेतली. (Nashik Loksabha)
यानंतर अनेक इच्छुकांची नावे समोर आली. मात्र, हेमंत गोडसेंच्या गळ्यात माळ पडली. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भुजबळांची मनधरणी करण्यासाठी त्यांची भेट घेतली. यानंतर दुसऱ्या दिवशी गोडसेंची उमेदवारी जाहीर झाली. यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनीही त्यांची भेट घेत चर्चा केली. मात्र, हेमंत गोडसे काही भुजबळांच्या भेटीसाठी आले नाही. (Nashik Loksabha)
Nashik Loksabha | नाशिकमधून हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर
भुजबळसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय
हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर “अपेक्षेप्रमाणे त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.” अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली होती. त्यामुळे गोडसेंना उमेदवारी दिल्यामुळे भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा होत्या. दरम्यान, काल मंत्री दादा भुसे यांनी छगन भुजबळांची भेट घेतली. यानंतर दादा भुसे यांना “भुजबळ नाराज आहेत का?” असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, “आपल्याला विनंती आहे की आपण उगाच काहीतरी नवीन प्रश्न निर्माण करू नये, असे कुठलेही महायुतीत विषय नाही.(Nashik Loksabha)
भुजबळसाहेब हे राज्यातील एक ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महायुतीचे सगळेजण जिल्ह्यात राज्यात काम करत आहोत आणि येथेही आमचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही एकजुटीने काम करू, असा विश्वास यावेळी दादा भुसेंनी व्यक्त केला. त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून, त्यांच्या सूचनेप्रमाणेच हे सगळे निर्णय झाले आहेत. असेही दादा भुसे यांनी सांगितले. (Nashik Loksabha)
Nashik Loksabha | नाशिकच्या जागेवरून भाजपची माघार; आता शिंदेंनी निर्णय घ्यायचाय
Nashik Loksabha | गोडसे का आले नाही..?
काल दादा भुसे यांच्यासोबत हेमंत गोडसे भुजबळांना भेटण्यासाठी आले नव्हते. याबाबत प्रश्न केला असता, दादा भुसेंनी सांगितले की, “उमेदवारी घोषित झाल्यानंतर ते देवीचा व राम मंदिरामध्ये प्रभू रामाच्या दर्शनासाठी गेले आहेत. भुजबळसाहेबांचा वेळ आम्ही आधीच घेतलेला होता. यानंतर त्यांचा विश्रांतीचा वेळ असतो. त्यामुळे वेळ घेतलेला असल्यामुळे आम्ही थेट त्यांच्या भेटीसाठी आलो, असं स्पष्टीकरण दादा भुसे यांनी दिले.(Nashik Loksabha)
शांतिगिरी महाराज आशीर्वाद आशीर्वाद
शांतिगिरी महाराजांनी शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज भरला होता. याबाबत दादा भुसे म्हणाले की,” शांतिगिरी महाराजांना विनंती आहे की, आपण सर्व एका विचारावर काम करणारे आहोत. त्यामुळे त्यांनी शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार खासदार गोडसे यांना आशीर्वाद द्यावे आणि मला विश्वास आहे की, शांतिगिरी महाराज हे महायुतीच्या उमेदवाराला आशीर्वाद देतील. (Nashik Loksabha)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम