Nashik Loksabha | २० मे रोजी पाचव्या टप्प्यात नाशिक आणि दिंडोरीत मतदान होणार आहे. काल प्रचाराचा शेवटचा दिवस होता. गेल्या महिनाभरापासून प्रचाराची सुरू असलेली रणधुमाळी काल अखेर शांत झाली. तर, आज शहरात शांततेचे वातावरण आहे.
Nashik Loksabha | याद राखा, लीड मिळाला नाही तर…
दरम्यान, गिरीश महाजनांनी “नाशिक १ विधानसभा, महापालिका व जिल्हापरिषदेच्या आजी माजी लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षेत्रात महायुतीच्या उमेदवाराला लीड मिळायलाच हवा. त्यावरच पुढील निवडणुकांमधील उमेदवाऱ्या निश्चित केल्या जातील. याद राखा, लीड मिळाला नाही. तर, पुढील निवडणुकांचे तिकीट कापले जातील, असा सज्जड इशारा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपच्या आजी माजी लोकप्रतिनिधींना दिला. लोकांना मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर आणा, अशा सूचनाही यावेळी त्यांनी केल्या.(Nashik Loksabha)
Nashik Loksabha | नाशिक लोकसभेचे गणित..; कमकुवत, मजबुत बाजु आणि जनतेचा कौल..?
भाजपच्या संकटमोचकांनीच ही निवडणूक हातात घेतली
नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात हेमंत गोडसे व डॉ. भारती पवार यांच्या उमेदवारीवरून नाराजीनाट्य सुरूच आहे. त्यामुळे महाजन यांनी नाशिकमध्ये तळ ठोकला आहे. तर, भाजपच्या संकटमोचकांनीच ही निवडणूक हातात घेतल्याचे येथे दिसत आहे. गोडसे व डॉ. भारती पवारांसाठी त्यांनी हॉटेल एसएसकेमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांसह माजी नगरसेवकांची त्यांनी बैठक घेतली. या बैठकीला आमदार राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, माजी महापौर सतीश कुलकर्णी, गणेश गितेंसह पदाधिकारी उपस्थित होते.(Nashik Loksabha)
यावेळी महाजन म्हणाले की, “नाशिकमध्ये महायुतीचे १२२ पैकी १०५ माजी नगरसेवक आहेत. शहरात भाजपचे ६५ नगरसेवक आहेत. ग्रामीणमध्येही आपली ताकद आहे. महायुतीची ताकद मोठी असल्याने घाबरण्याची आवश्यकता नाही. महायुतीच्या उमेदवाराचा विजय सहज आहे”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केल्या.
Nashik Loksabha | नाशिकमध्ये ठाकरे-शिंदे गट आमने सामने; तर, शिंदेंनी चालवला काल्पनिक बाण
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम