Nashik Loksabha | भुजबळ घराण्याला दोन वेळा पराभवाची धूळ चारणाऱ्या गोडसेंचा प्रचार भुजबळ समर्थक कसे करणार ?

0
27
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

Nashik Loksabha |  गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीत नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच सुरू होती. या जागेसाठी शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ हे आग्रही होते. यावरून दोघांमध्ये शाब्दिक टोलेबाजीही सुरू होती. दिल्लीतून नावावर शिक्कामोर्तब झाल्याचेही भुजबळांनी सांगितले होते. मात्र, अचानक भुजबळांनी जाहीर माघार घेतली आणि नाशिकच्या राजकारणाला एक नवे वळण लागले. (Nashik Loksabha)

सुमारे दीड महीने चाललेल्या या हायव्हॉल्टेज राजकीय नाट्याचा अखेर शेवट झाला. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडली. पण यासाठी त्यांना मुंबई आणि ठाणे वारी, दोन वेळा मुख्यमंत्र्यांसमोर शक्तिप्रदर्शन, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन, सर्व इच्छुक उमेदवारांनाची समजूत काढणे इतके परिश्रम घ्यावे लागले. मात्र, वरून जरी सगळे साजिरे दिसत असले. तरीही महायुतीत अंतर्गत खदखद आहेच. (Nashik Loksabha)

Nashik Loksabha | ठाकरेसेनेत बंडखोरी; विजय करंजकरांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

नाराज भुजबळ समर्थक गोडसेंचा प्रचार कसे करणार..?

भुजबळांची समजूत घालण्यासाठी मंत्री गिरीश महाजन, चंद्रशेखर बावणकुळे, दादाजी भुसे, या सर्वांनी परिश्रम घेतले. यानंतर भुजबळांनी  आपण महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी एकजुटीने काम करणार असल्याचे सांगितले. मात्र, भुजबळ विरुद्ध गोडसे हा इतिहास बघितला. तर, गेल्या २०१९ च्या निवडणुकीत गोडसेंनी समीर भुजबळ यांचा २,९२,२०४ मतांनी दारुण पराभव केला होता. तर, २०१४ च्या निवडणुकीत गोडसेंनी छगन भुजबळांचा १,८७,३३६ मतांनी पराभव केला होता आणि या निवडणुकीत तर, गोडसेंमुळे त्यांना तिकिटच नाही मिळाले. यामुळे आधीच नाराज असलेले भुजबळ समर्थक हेमंत गोडसेंचा प्रचार कसे करणार..?(Nashik Loksabha)

आपल्या नावावर दिल्लीतून शिक्कामोर्तब झाला. मात्र, त्यानंतर कित्येक दिवस उलटून गेले तरीही महायुतीच्या राज्यातील नेत्यांनी उमेदवारी जाहीर न केल्यामुळे संतापलेल्या छगन भुजबळांनी निवडणुकीतून जाहीर माघार घेतली. यानंतर समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या नेत्यांचा निषेधही केला होता, तर, भुजबळांचे कट्टर समर्थक असलेले अंबदास खैरे यांनीही उमेदवारी अर्ज घेतला होता. मात्र, महायुतीच्या नेत्यांनी भुजबळांची समजूत काढल्यानंतर त्यांनीही माघार घेतल्याचे सांगितले. (Nashik Loksabha)

Nashik Loksabha | नाशिकच्या उमेदवारीसाठी केदा आहेरांचा विचार न झाल्याने कार्यकर्ते नाराज..!

Nashik Loksabha | हेमंत गोडसेंची अंतर्गत कोंडी

मात्र, असे असले तरीही आपल्या नेत्याचा पराभव आणि इच्छा मारून समजुतीची भूमिका घ्यावी लागली, हे कार्यकर्ते भुजबळ समर्थक जाणून असताना ते गोडसेंचा प्रचार करतील का..? नाशिकमध्ये २० मे रोजी मतदान होणार असून, आता गोडसेंकडे प्रचारासाठी अवघे १५ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे आधीच संकटात असलेल्या हेमंत आप्पांना भुजबळ समर्थकांच्या अंतर्गत रोषाला सामोरे जावे लागेल का..? यामुळे हेमंत गोडसेंची अंतर्गत कोंडी होणार का आणि यावर स्वतः छगन भुजबळ काय भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे. (Nashik Loksabha)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here