Nashik Lok Sabha | माजी आमदारांचे कांद्याच्या माळा घालून मतदान; चांदवडमध्येही तरुणांचा निषेध

0
25
Nashik Lok Sabha
Nashik Lok Sabha

Nashik Lok Sabha |  नाशिक आणि दिंडोरीच्या मतदानावर कांदा प्रश्नाचा प्रभाव आहे.  हे सुरुवातीपासूनच वाटत होती. मात्र, आज मतदानाच्या दिवशी हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सुरुवातीला निफाडमध्ये शेतकऱ्यांनी गळ्यात टोमॅटो आणि कांद्याच्या माळा घालून मतदान केले. याच घटनेची पुनरावृत्ती अता चंदवड आणि सटाणा येथेही पाहायला मिळाली. कांदा निर्यात बंदीमुळे (onion export ban) कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. (Nashik Lok Sabha)

याचा परिणाम कुठे तरी मतदानावर होणार हे निश्चित होते. शेतकरी त्यांचा रोष हा मतपेटीत उतरवणार हे सुरुवातीपासूनच दिसत होते. दिंडोरी मतदार संघात याचा प्रभाव अधिक आहे. दरम्यान, गळ्यात कांद्याची माळ घालत मतदार संघात अनेक शेतकऱ्यांनी मतदान केले आहे. यात सटाणाच्या माजी आमदार दिपीका चव्हाण आणि माजी आमदार संजय चव्हाण यांनीही गळ्यात कांद्याची माल घालून मतदान केले. सटाणा शहरातील मराठी शाळा या मतदान केंद्रावर चव्हाण दाम्पत्याने सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. (Nashik Lok Sabha)

Nashik Lok Sabha | राजकीय पक्षांच्या सभा, रोड शो; अन् शांतीगिरी महाराजांचा प्रचाराचा फंडा

Nashik Lok Sabha | चांदवडमध्येही पुनरावृत्ती 

गेल्या वर्ष भरापासून कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी राजा मेटाकुटीला आला. यावरुण संतप्त शेतकाऱ्यांनीच ही निवडणूक हातात घेतल्याने या मतदार संघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यंदाच्या निवडणुकीत कांदा प्रश्न चांगलाच गाजला होता. यातच आज संतप्त शेतकऱ्यांनी मतदानाच्या दिवशीही सरकारला कांदा प्रश्नांची आठवण करून दिली आहे.(Nashik Lok Sabha)

दरम्यान, नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडगाव-पंगू येथे काही तरुण कांड उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा निर्यात बंदी आणि कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे निषेध व्यक्त करत कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदान केंद्रात जाण्याचा प्रयत्न केला.  मात्र, यावेळी या तरुणांना मतदान केंद्राच्या गेटवरच पोलिसांनी अडवले आणि त्यांची समजूत घालत त्यांना गळ्यातील कांद्याच्या माळा काढायला सांगितले. यावेळी तरुणांची पोलिसांसोबत काहीकाळ शाब्दिक चकमक झाली. मात्र, यानंतर पोलिसांनी त्यांना शांत केले. मग त्यांनी गळ्यातील माळा काढून ठेवलय आणि शांततेत मतदान केले.

Nashik lok Sabha | शांतीगिरी महाराजांचा जाहीरनामा; बघा काय आहे बाबांचे नाशिकचे व्हीजन..?

कांद्याच्या माळा आम्हाला दाखवा, अधिकारी काय करणार

या प्रकरणी “मतदारांनी मतदान केंद्रात कांद्याच्या माळा घाऊन जाऊन मतदान केले. याला तेथील अधिकारी काहीही करू शकत नाही. कांद्याच्या माळा आम्हाला राजकारण्यांना दाखवा. राजकारण्यांपुढे तुम्ही सत्याग्रह करा. यावर ते मतदान अधिकारी काय करणार..?, असे मंत्री भुजबळ म्हणाले. (Nashik Lok Sabha)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here